Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

.. तर महायुती सरकारमधून बाहेर पडू – धर्मराव अत्राम

नागपूर: धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला तर आपण राजीनामा देऊन महायुती सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव अत्राम यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना आपल्याच सरकारला दिला आहे. 

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन होत आहे तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र प्रवर्गातून ते द्यावे यासाठी ओबीसी संघटना आरक्षण बचाव आंदोलन करीत आहेत. त्याच बरोबर धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या साठीही आंदोलन सुरू आहे. 

आरक्षणाच्या आंदोलनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले असताना धर्मराव  अत्राम यांच्या धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

यापूर्वी धर्मराव अत्राम यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांनी पित्याच्या भूमिकेला छेद देत शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्राम हे चर्चेत राहिले. आमदारकी घरातच राहावी यासाठी अत्राम राजकीय खेळी करत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर बोलताना अत्राम यांनी आमदारकी राजघराण्यातच राहणार असा दावा केला आहे. तब्बल चाळीस वर्ष आमदारकी अत्राम घराण्यात राहिली असून यापुढेही कायम राहील. मी स्वतः मैदानात आहे. पुतण्या आणि मुलगी देखील मैदानात आहे, असे त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading