‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीच्या आईने अरबाजबद्दल केला मोठा खुलासा
Bigg Boss Marathi Day 62 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की आणि अरबाज एकत्र गेम खेळत आहेत. त्यांच्या जोडीने ‘बिग बॉस मराठी’चं घर चांगलच गाजवलं. दोघांच्या रोमँटिक अंदाजानेदेखील प्रेक्षकांना वेड लावलं. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीच्या आईने अरबाजबद्दल मोठा खुलासा केला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या फॅमिली वीक पार पडत आहे. सर्व सदस्यांच्ये कुटुंबीय घरात येत आहेत. आजच्या भागात निक्कीची आई बिग बॉस मराठीच्या घरात आलेली पाहायला मिळेल. समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्कीची आई आपल्या लेकीला सांगत आहे,”अरबाज चुकीचा चाललाय.. त्याने असं करायला नव्हतं पाहिजे. त्याचा साखरपुडा झालेला आहे असं म्हणतात”.
अरबाजबद्दलचा मोठा खुलासा ऐकल्यानंतर निक्कीला मोठा धक्का बसतो. निक्की पुढे म्हणतेय,”अरबाज जर आला तर मी खचून जाईल. अरबाज-निक्की जे होतं ते आता संपलं आहे…अरबाजचे कपडे फेकून द्या”. निक्की आणि अरबाजच्या नात्यात दुरावा येणार का? याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.
‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM
