Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

पाणगेंडा ओळखताना सूरजची झाली दमछाक

Bigg Boss Marathi Day 53 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये नावीन्य आहे. या आठवड्यात घरात जंगल राज असणार आहे. 50 दिवस उलटल्यानंतरही टास्कमध्ये सदस्य तेवढीच मजा करताना दिसत आहेत. त्यामुळे टास्क आणखी रंगतदार होणार आहे. आजच्या भागात पाणगेंडा ओळखताना सूरजची दमछाक झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे घरात एकच कल्ला होईल.

‘बिग बॉस मराठी’चा आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये, अंकिता सूरजला पाणगेंड्याची अॅक्टिंग करुन दाखवत आहे. तर सूरजला ती कोणत्या प्राण्याची अॅक्टिंग करतेय हे ओळखायचं आहे. सूरजने गेंडा बरोबर ओळखला आहे. पण पाणगेंडा ओळखण्यात त्यांची झालेली पंजायत पाहून प्रेक्षकांना मात्र मजा येईल.

सूरजने पाणगेंडा ऐवजी फक्त गेंडा म्हटल्याने अभिजीत म्हणतोय,”पूर्ण केलं नाही अजून”. त्यावर हताश सूरज म्हणतोय,”काहीच कळत नाही आहे. ओळखलाय पण पाण्यातला गेंडा माहिती नाही”. बी बी करन्सी मिळवण्याचा हा टास्क मात्र खूपच मजेदार आहे. संपूर्ण घराने एकत्रित किती बी बी करन्सी कमावली हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहा.

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading