गोल्फ कॅप्टन चषकाला उस्फूर्त प्रतिसाद
पुणे : अतिशय प्रतिष्ठित अशा कँप्टन चषकाचे आयोजन येरवडा येथील गोल्फ कोर्स पार पडले .या गोल्फ स्पर्धेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला .या वर्षाचा कॅपटन चषकाचे मानकरी दिवेश वाधवान ,अविनाश देवस्करद्वितीय तर ठरले .तर कालिया पी सी तृतीय क्रमांक मिळवला .
यास्पर्धेचे आयोजन येरवडा गोल्फ कोर्स चे कप्तान व आयोजक इक्राम खान यांनी केले होते .
या स्पर्धेत दुसऱ्या गटात शौर्य खंडेलवाल प्रथम ,संजीव हुकमनी द्वितीय,अजय पाटील यांना तृतीय क्रमांक मिळाला .
तिसऱ्या गटात संजीव भाटिया प्रथम ,रत्नाकर कर्वे द्वितीय ,जगदीप सिंघ तृतीय असे विजेते होते चौथ्या गटात प्रदीप नाडकर्णी प्रथम ,सुहास ठक्कर द्वितीय तर प्रकाश गुगले तृतीय क्रमांक मिळाला .सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक आनी बक्षिसे देण्यात आली यावेळी गोल्फ क्लब येरवडाचे कप्तान इक्रम खान यासह इतर मान्यवर उपस्थित होते .
