Pune Breaking : गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना गोळीबार
पुणे : देशभरात गणपती बाप्पाला निरोप दिला जाता आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गणपती विसर्ज मिरवणूक सुरू असताना गोळीबार झाला आहे, या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिक घाबरले. त्यासोबतच पोलिसांचीही धावपळ झाली. पिंपरी चिंचवडमध्ये मुंबई- बंगळुरु हायवे लगत असलेल्या फिनिक्स मॉलच्या गेट नंबर 8 वर अज्ञात व्यक्तीन हवेत गोळीबार केला आहे. हवेत गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पुण्यात गेल्या आठवड्यामध्य सलग तीन दिवस गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. शहरात मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाची मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात गणेशाचे विसर्जन केले जात आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले आहेत. त्यामुळे अशावेळी गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
