Kolhapur : गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना एकाची हत्या
कोल्हापूर : गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाची हत्या करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या मटण मार्केटजवळ एकाचा खून करण्यात आला आहे. हातगाडी लावण्यावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्येनंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हातगाडी लावण्यावरून इम्रान इमाम मुजावर याच्यावर आराम कॉर्नर भागामध्ये चाकूने हल्ला करण्यात आला. यानंतर इम्रान मुजावर या 32 वर्षीय तरुणाला उपचारासाठी नेण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयीत आरोपी यूसुफ अलमसजीत याला राजावाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
