सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लेखक,पत्रकार, समाजसुधारक,वक्ते केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे प्रबोधनकार ठाकरे यांना प्र – कुलगुरु प्रा. (डॉ.) पराग काळकर यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात यावेळी माहिती अधिकारी मेघना भोसले यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
