Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॉस मराठी’च्या घरावर या आठवड्यात जंगलराज; बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी?

Bigg Boss Marathi Day 51 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात टास्कमध्ये 50 दिवसांनंतरही तेवढीच मजा येत आहे. प्रत्येक टास्कमध्ये सदस्य मजा करण्यासोबत राडा आणि धुमाकूळ घालताना दिसत आहे. पण आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात जंगलराज असलेलं पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा टास्क आहे.

प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस मराठी’च्या घरावर या आठवड्यात जंगलराग असणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिकाऱ्याची बंदूक जास्तीत जास्त मिळवणारी टीम या कार्यात यशस्वी होईल. टास्कमध्ये डीपी दादा म्हणत आहेत,”आपल्याला ते षडयंत्र वापरावं लागेल”. तर अरबाज म्हणतोय,”काहीही करा लीड आपल्याला करायचं आहे”. निक्की म्हणतेय,”टीम वाटलीच पाहिजे”. प्रोमोमध्ये शेवटी जान्हवीला दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे.’बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणाऱ्या जंगलराजमध्ये कोण राज्य करणार आणि कोण बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी? हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहायला विसरू नका.

आजच्या भागात अभिजीत डीपी दादांना अंकितासोबत काय वाकडं झालंय का हे विचारताना दिसणार आहे. त्यावर उत्तर देत डीपी दादा म्हणतात,”बास झालं.. जवळीक एका मर्यादेपर्यंतच बरी. जिथे मला वाटेल अडचणीत आहे तिथे मी उभा राहणार. बाकीवेळेस माझ्याकडून तू अपेक्षा करू नकोस. पुस्तकाची पाने भरपूर आहेत. तुम्ही उजव्या बाजूचीच पाहत आहात. डाव्या बाजूलाही लेखकाने कष्ट घेतले आहेत. तुम्हाला उजव्या पाणावर लिहायला जी मजा येत आहे ती डाव्या पानावर येत नाही. पण नंतर डाव्या पाणावर लिहायलाच मजा येते”.

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading