Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील अधिकारी व जवानांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

    पुणे : श्री गणेश महाराज की जय… गणपती बाप्पा मोरया… भारत माता की जय… जय हिंद अशा घोषणांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडप दुमदुमून गेला. भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या दक्षिण कमांड (सदर्न कमांड) मधील अधिकारी जवानांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत आरती केली.

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे १३२ व्या वर्षी आयोजित गणेशोत्सवात दक्षिण कमांड चे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचे स्वागत व सन्मान ट्रस्टतर्फे करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय जवानांना व त्यांच्या कुटुंबाना गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेता यावे, याकरिता हे अधिकारी व जवान गणेशोत्सवात आवर्जून येतात. यावेळी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी देखील सन्मानचिन्ह देऊन ट्रस्टचा गौरव केला. तसेच ट्रस्टच्या कार्याची माहिती देखील जाणून घेतली.

    Leave a Reply

    Discover more from Maharashtra Lokmanch

    Subscribe now to keep reading and get access to the full archive.

    Continue reading