Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

“निक्की इमोशनल आहे.. ” टीम A मधल्या सदस्यांनी मांडले मत

Bigg Boss Marathi Day 46 : ‘बिग बॉस मराठी’च्या मागील भाऊच्या धक्क्यावर निक्कीला पूर्ण आठवड्याची भांडी घासायची ही शिक्षा रितेश भाऊंनी दिली होती. तिची घरातली वागणूक पाहून घरामधील इतर सदस्यांना देखील तिची ही शिक्षा बरोबर वाटत होती.

आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातले टीम ‘A’ मधील अभिजित , पॅडी , सूरज , अंकिता आणि आर्या हे सगळॆ जण गार्डन एरियात बसून निक्की विषयी बोलताना दिसत आहेत. पॅडी म्हणाले,” निक्की दाखवते की तिला काही नाही वाटले पण ती थोडी मनाने हलली आहे. तिचे बोलणे पण वेगळे वाटते. त्यावर अभिजित म्हणाला , ” काल मी बसून गाणे गायले ना. तेव्हा ती रडली आणि परत आता मध्ये जाऊन देखील ती रडली. ती खूप इमोशनल आहे . सुरज म्हणाला की ,” ती तुझी मैत्रीण आहे. ती तुझ्याकडे आणि अरबाज कडेच बोलायला जाते . त्यावर अभिजित म्हणाला ,” निक्की काम चांगले करते पण सगळे बेसिंग वगरे स्वच्छ ठेवते. त्यावर अंकिता अभिजितला म्हणाली ,” तू तिने केलेले काम चेक करायला पण जातोस? अभिजीतचे एक आहे. तो निक्की वरती काही बोलला तर लगेच माझ्याकडे बघतो. जर मला पेन आणि पेपर दिला ना तर मी खूप काही लिहून ठेवले असते. जसे की, तू या वेळी या दिवशी हे वाक्य तू निक्कीला बोललास. त्यावर अभिजित म्हणाला ,” अंकिता रेडी असते माझ्याबद्दल सगळेनोट करायला. ती गाईड घेऊन बसते आणि सगळे लिहून ठेवते .यावर सुरज म्हणाला ,” भावा घायाळ होऊ नकोस . नाही तर वहिनी शेरनी आली ना कारण बिग बॉसने लिहिले आहे. मी येतोय पण शेर सोबत शेरनी पण येऊ शकते.”

‘BIGG BOSS मराठी’, UNSEEN UNDEKHA पाहा @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading