गणेश मुर्तिंचे विसर्जन करण्यासाठी शिवसेनेकडून कृत्रिम तलावाची निर्मिती
मुंबई – गणेशोत्सव काळात तमाम गणेश भक्तांना गणेश मुर्तिंचे विसर्जन करण्यासाठी काही अडचण येऊ नये म्हणुन शिवसेनेच्यावतिने ईशान्य मुंबईत कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. जेणे करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा तलावांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात यावा, असे आवाहन जीवनदान संस्थेच्या अध्यक्षा राजोल संजय पाटील यांनी केले आहे. त्यांच्या शुभहस्ते मुलुंड मध्ये कृत्रिम तलावाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
मुलुंड पश्चिम येथील नाहूर या ठिकाणी असलेल्या अँटमॉस पेअर्स सोसायटीच्या आवारात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहे. जीवनदान संस्थेच्या अध्यक्षा राजोल संजय पाटील यांच्या हस्ते या तलावाच्या कामाच शुभारंभ करण्यात आला. पर्यावरणाला बाधा होऊ नये तसेच गणेश भक्तांना गणरायांच्या मुर्तिंचे विसर्जन करताना काही अडचण येऊ नये म्हणुन शिवसेनेच्यावतिने ईशान्य मुंबईत असे कृत्रिम तलाव बांधण्यात येत आहे. सर्व गणेश भक्तांनी अशा कृत्रिम तलावात गणेरायाच्या मुर्तिचे विसर्जन करावे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावी, असे आवाहन राजोल पाटील यांनी केले आहे.
