तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिचे पुणेकरांना घेता येणार दर्शन
पुणे : ऐतिहसिक पुणे शहरात प्रथमच श्रीलंका देशातून तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या अस्थिधातू येणार आहेत त्यानिमित्त इंडो एशियन मेट्टा फाऊडेशन इंडीया यांच्यावतीने आस्थिकलश धातू वंदन व आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघ यांची भव्य आस्थिकलश यात्राची सुरूवात पुणे शहरातून दि. १० संप्टेबर रोजी होणार असून तथागत भगवान गौतम बुद्ध व बौद्धिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आस्थिचे पुणेकर नांगरीकना दर्शन घेता यावे या उद्देशाने बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यावतीने मंगळवार दिनांक १० संप्टेबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत मुंकुदराव आंबेडकर चौक विश्रातवाडी पुणे या ठिकाणी शहर व जिल्ह्यातील नागरिकांना तथागत भगवान बुध्द यांच्या अस्थिधातू कलशाचे वंदन करायला मिळणार असून यावेळी श्रीलंका येथील पुजनीय बौध्द भिक्खू संघ, तसेच भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भिमरावजी आंबेडकर, बौध्दजण पंचायत समिती सभापती सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थित काळात महापरित्राणाचे पठणही सुरू राहणार आहे.तसेच आस्थी कलशाचे दर्शन धम्मदेसना मिळणार आहे
सुरेंद्र पठारे यांच्या वतीने बौद्ध भिक्खूंना चिवर दान तसेच आलेल्या अनुयायी साठी खीर वाटप करण्यात येणार आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायीनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक विवेक बनसोडे ,सर्जेरावभाऊ वाघमारे, नितिन गजभिये ,युवराज बनसोडे ,कैलाश ,मोरे,दिनेश करमकर यांनी केले
प्रशासनाने आस्थी कलशाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी अशी मागणी ही निमंत्रक सुरेंद्र पठारे यांनी केली आहे.
