Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनिल देशमुख यांच्यावर CBI ने केला गुन्हा दाखल

जळगाव: मंत्री गिरीश महाजन यांना अडकविण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना या प्रकरणामुळे महा विकास आघाडीला धक्का बसला आहे.

पुण्यात एका कथित अपहरण प्रकरणानंतर गिरीश महाजन यांच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास जळगावमध्ये वर्ग करून घेण्यासाठी देशमुख यांनी आपल्याला वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधला, असा जबाब जळगांवचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी सीबीआयला दिला आहे. त्या आधारे देशमुख यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. 

महाविकास आघाडी सत्तेवर असताना महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात आल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भर अधिवेशनात केला होता. त्याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ दृकश्राव्य मुद्रण असलेला पेनड्राईव्ह सभागृहात सादर केला. या पेनड्राईवमध्ये तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयासह तीन ठिकाणच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. 

या प्रकरणी सीबीआयने चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात पोलिसांवर दबाव आणल्याच्या कारणाने देशमुख यांनाही आरोपी करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading