राज्य सरकार पाठोपाठ पंतप्रधानांनीही मागितली शिवरायांची व शिवभक्तांची माफी
वाढवण बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन
मुंबई : आमच्यासाठी शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे आराध्य दैवत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी मालवण मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा; ही घटना आमच्यासाठी अतिशय त्रासदायक आहे. मी त्या घटने बद्दल शिवाजी महारांच्या चरणावर डोक ठेवून माफी मागतो. काही जण सावरकरांवर टीका करतात. पण माफी मागत नाही. पण आमच्यावर संस्कार वेगळे आहेत. पश्चाताप न होणाऱ्यांमध्ये आम्ही नाही. आम्ही चुकी झाली तर माफी मागतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मालवण येथे झालेल्या घटनेची माफी मागत कॉँग्रेसला टोला देखील लगावला.
वाढवण बंदराचे (Vadhavan port) भूमीपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान बोलत होते.
विरोधकांनी 60 वर्ष हा प्रकल्प रखडवला
पंतप्रधान मोदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सागरी दळणवळण, सागरी व्यापराला सुरूवात केली आणि अधिक सक्षम केला. कान्होजी आंग्रे हे इंग्रजांवर भारी पडले. मात्र स्वातंत्र्यानंतर या कडे फारसे दिले गेले नाही. मात्र, मोदी सरकार आल्यावर भारतातील बंदराच्या विकासाला अधिक प्राधान्य देण्यात आले. आज वाढवण बंदराकडे जगाचे लक्ष आहे. याचे लोकेशन तर सोन्याहून पिवळे आहे. कित्येक वर्षांपासून वाढवण बंदराची गरज होती. जागतिक दर्जाच्या या बंदारांमुळे हजारो रोजगार निर्मिती होणार आहे. पण विरोधकांनी 60 वर्ष हा प्रकल्प रखडवला. महाराष्ट्रात 2019मध्ये आलेल्या सरकारने या बंदराच्या विकासाला विरोध केला. ज्यांनी विकासाला, रोजगार निर्मितीला विरोध केला त्यांना जनता माफ करणार नाही, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मच्छीमारी जाहाजांवर 1 लाख ट्रान्सपॉंडर लावणार
रोजगार निर्मितीसाठी या बंदराचा विकास होणे गेराजेचे आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि मच्छीमायऱ्यांना देखील रोजगार मिळणार आहे. सॅटेलाइटच्या मदतीने मच्छीमायऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संकटकाळी मच्छीमायऱ्यांचा जीव वाचवणे ही देखील सरकारची जबाबदारी आहे. यासाठी मच्छीमारी करणाऱ्या जाहाजांवर 1 लाख ट्रान्सपॉंनडर लावण्यात येणार आहेत. ज्यामुळे संकट काळात मच्छिमार मदत मागू शकतील. तटरक्षक दल आणि कुटूंबियांशी जोडले जावू शकतील, असे ही मोदी म्हणाले.
