Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNESports

‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, त्यामुळे मेहनत करत रहा – ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे 

ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांनी दिले अमोल रावेतकरांना धन्यवाद

पुणे : पदार्पणातल्या ऑलिम्पिक स्पर्धेतच चमकदार कामगिरी करत भारतासाठी कांस्य पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळे याने आज अमोल रावेतकर यांच्या प्रभात रस्त्यावरील कार्यालयात त्यांची सदिच्छा भेट घेतली व राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना स्वप्नील कुसाळे म्हणाला, “खेळाडू म्हणून जडणघडण होत असतानाच्या काहीजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. अगदी त्याच प्रमाणे माझ्या त्या काळात अमोल रावेतकर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि मला प्रशिक्षणासाठी लागणारी मोठी आर्थिक मदत त्यांनी दिली. इक्वीपमेंट, अम्युनेशन, स्पर्धा खेळण्यासाठी होणारा प्रवास यावर बराच खर्च होत असतो. रावेतकर यांनी मदत केल्याने माझा तो भार हलका झाला. अशा प्रकारची मदत जेंव्हा वेळेत मिळते तेंव्हा खेळाडूची कामगिरी नक्की उंचावते.”

आज राष्ट्रीय खेळ दिवस आहे. त्यानिमित्ताने उदयोन्मुख खेळाडूंना तुम्ही काय संदेश द्याल असे उपस्थितांनी विचारले असता स्वप्नील म्हणाला, “खेळाडूने कायम न्यूटूीशन आणि फिटनेस वर भर द्यायला हवा. तसेच आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही’ ही मराठी म्हण कायम लक्षात ठेवावी, ध्यास घेवून मेहनत करावी आणि इतिहास घडवावा.”

“स्वप्नीलने देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकून आम्ही त्याच्या वाटचालीत दिलेल्या या योगदानाचे अक्षरशः चीज केले याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. पहिल्यांदा स्वपील मला भेटला तेंव्हा १९ वर्षांचा एक तरुण, नम्र आणि डोळ्यात मोठी मोठी स्वप्न असणारा खेळाडू म्हणून. त्याची ही स्वभाव वैशिट्ये मला भावली आणि आम्ही त्याला मदत करायचे ठरवले. आज ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यावर देखील त्याच्या स्वभावात व वागण्यात काही फरक झालेला नाही हे बघून खूप बरे वाटले. स्वप्निलला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना आम्ही त्याच्या पुढील प्रशिक्षणासाठी रुपये ५ लाख इतके योगदान देत आहोत. स्वप्नीलने यापुढेही देशासाठी अनेक पदक जिंकून महाराष्ट्राचे नाव मोठे करावे.” अशा शुभेच्छा यावेळी अमोल रावेतकर यांनी दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading