Sunday, June 7, 2026
Latest NewsLIFESTYLE

लाइफस्टाइलने सिटी वन मॉल, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे मिथिला पालकरसोबत ऑटम विंटर 2024 कलेक्शन लॉन्च केले

पिंपरी-चिंचवड, : लाइफस्टाइल स्टोअर, जे भारतातील प्रमुख फॅशन डेस्टिनेशन्सपैकी एक आहे, यांना सिटी वन मॉल, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे त्यांच्या ऑटम विंटर 2024 (AW24) कलेक्शनचे लाँच साजरे करताना अत्यंत आनंद होत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि फॅशनची चाहती, मिथिला पालकर यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून, नवीन कलेक्शनमधील त्यांच्या आवडत्या आउटफिट्सचे अनावरण केले, ज्यामुळे लाँचचा उत्साह आणखीनच वाढला.
लाइफस्टाइलचे ऑटम विंटर 2024 कलेक्शन समकालीन स्टाइल आणि हंगामी ट्रेंडसाठी एक उत्तम पर्याय आहे, जो प्रत्येक प्रसंगासाठी विविधता देते. या कलेक्शनमध्ये वर्क केलेल्या आकर्षक कपड्यांपासून ते व्हायब्रंट प्रिंट्सपर्यंत अनेक प्रकारचे आउटफिट्स आहेत, जे तुमच्या रोजच्या पोशाखात रंग आणि चैतन्य भरतील. साधेपणा आवडणाऱ्यांसाठीही, या कलेक्शनमध्ये आकर्षक डिझाइन्ससह रोजच्या वापरातील आवश्यक आउटफिट्सचा समावेश आहे.

रोहिणी हल्दिया, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट – मार्केटिंग, लाइफस्टाइल, लाँचबद्दल बोलताना म्हणाल्या, “आमच्या ऑटम विंटर 2024 कलेक्शनच्या लॉन्चसाठी मिथिला पालकर आमच्यासोबत सामील झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 19 आणि पुण्यात 8 स्टोअरसह, पिंपरी-चिंचवड हे आमच्यासाठी एक प्रमुख मार्केट आहे. या शहरात आमचे नवीन कलेक्शन आणण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांसोबत या लाँचचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत.”

या कलेक्शनबद्दल बोलताना, भारतीय अभिनेत्री मिथिला पालकर म्हणाली, ” जेव्हा मी लाइफस्टाइल स्टोअरमध्ये जाते, तेव्हा असे वाटते की मी सर्वोत्तम फॅशन स्टोअरमध्ये आली आहे, जिथे मला माझ्या स्टाइलच्या सर्व गोष्टी मिळतात. मी विशेषतः ऑटम विंटर 24 कलेक्शन पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे; स्टायलिश कपडे आणि बोल्ड पॅटर्नने मला माझ्या पोशाखाला नवीन लूक देण्यासाठी प्रेरित केले आहे. मला विश्वास आहे की या नवीन कलेक्शनमध्ये सर्वांनाच काहीतरी आवडेल.

लाँच दरम्यान, मिथिला पालकरने कोथरूडमधील लाईफस्टाईल स्टोअरला देखील भेट दिली, जिथे त्यांनी ग्राहकांशी संवाद साधला आणि नवीन कलेक्शन लाँच करण्याचा आनंद साजरा केला. लाइफस्टाइल त्याच्या ऑटम विंटर 2024 कलेक्शनमधून नवीन ऑफर दाखवण्यासाठी उत्सुक आहे, जे आता त्यांच्या स्टोअरमध्ये आणि http://www.lifestylestores.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading