Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी’च्या घरातील नवी जोडी पाहिलीत का?

Bigg Boss Marathi New Season Day 30 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन बघता बघता एक महिना पूर्ण झाला आहे. गेले महिनाभर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील निक्की आणि अरबाजची मैत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण भाऊच्या चक्रव्यूहात गेल्यावर निक्कीसमोर सत्य आलं आहे. सत्य समोर आल्यानंतर निक्की आणि अरबाजमध्ये चांगलाच दुरावा आला आहे. निक्की एकटी खेळेल असं वाटत असताना तिने अभिजीतसोबत हातमिळवणी केलेली आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत गप्पा मारताना दिसत आहेत. दरम्यान बिग बॉस म्हणतात,”अभिजीत जोडीत बांधले गेले आहात. या परिस्थितीवर कोणतं गाणं सुचतयं?”. त्यावर अभिजीत म्हणतो,”हम दोनो”. त्यानंतर घरात एकच हशा पिकतो.

अभिजीतच्या गाण्यानंतर अंकिता म्हणते,”आज कळलं आम्हाला जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात”. त्यावर अभिजीत ‘कुछ तू लोग कहेंगे’ हे गाणं म्हणतो. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच कमाल असणार आहे. घरातील सदस्य घाबरलेले असताना दुसरीकडे निक्की आणि अभिजीत सदस्यांना चांगलच हसवणार आहेत.

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading