पीएच. डी. प्रवेश परीक्षा (PET) ३१ ऑगस्टला
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणारी पीएच.डी. प्रवेश परीक्षेची (PET) तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आधी शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. मात्र २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद संदर्भातील बातम्या विविध प्रसारमाध्यमे/ वृत्तवाहिन्यावर प्रसिध्द झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी/विद्यार्थीनींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब/अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा २४ ऑगस्ट ऐवजी आता ३१ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. सदरील परीक्षेचे सुधारीत प्रवेश पत्र लवकरच विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पेट परीक्षेच्या इतर कोणत्याही बाबींमध्ये बदल होणार नसल्याचे शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी सांगितले.
