पीजीआयएम इंडिया म्युच्यूअल फंडातर्फे गुंतवणूकदारांसाठी पीजीआयएम इंडिया मल्टी कॅप फंड
मुंबई : पीजीआयएम इंडिया म्युच्यूअल फंडाने गुंतवणूकादारांसाठी पीजीआयएम इंडिया मल्टी कॅप हा मुदतमुक्त श्रेणीतील फंड आणला आहे. हा फंड लार्ज, मिड आँणि स्मॉल कॅप श्रेणीतील समभागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. या फंडासाठी निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 TRI हा निर्देशांक आधारभूत निर्देशांक राहणार आहे. नवीन फंड ऑफऱ (एनएफओ) गुंतवणूकीसाठी 22 ऑगस्ट 2024 पासून खुली होत असून 5 सप्टेंबर 2024 ला बंद होणार आहे.
शेअरबाजारात असलेल्या तात्कालीन अस्थिरतेमुळे बाजाराबाबत सध्या आपली काय धारणा आहे ?, हा प्रश्न हमखास विचारला जातो. परंतु या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे आणि बाजाराबाबत कोणीही अंदाज बांधू शकत नाही. या प्रश्नापाठोपाठ विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे सध्याच्या बाजाराच्या स्थितीत आम्ही गुंतवणूक केली पाहिजे का, याबाबत आपले मत काय ? हा आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या वैयक्तिक स्थितीनुरूप आणि त्यांच्या विश्वासार्ह सल्लागाराच्या उद्दीष्टानुसार अतिशय योग्य पध्दतीने देता येत असले तरी, शिस्तबध्द पध्दतीने शेअरबाजारातील सर्व प्रकारच्या भांडवली मूल्यात गुंतवणूक करणे, हे साधे सोपे पाऊल होय. मल्टी कॅप धोरण गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या बाजारमूल्यामध्ये म्हणजेच मार्केट कॅप्समध्ये त्यांच्या गुंतवणूकीत विविधता आणण्यासाठी शिस्तबद्ध दृष्टीकोन प्रदान करते,” अशी टिप्पणी पीजीआयएम इंडिया ॲसेट मॅनेजमेंटचे सीईओ अजित मेनन यांनी या फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना केली.
पीजीआयएम इंडिया ॲसेट मॅनेजमेंटचे सीआयओ विनय पहरिया याप्रसंगी म्हणाले, “उत्तम गुणवत्ता आणि उच्च वृध्दी दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या विविधांगी पोर्टफोलिओत गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य असल्याचा आमची धारणा आहे. या कंपन्यांच्या आंतरिक मूल्यात जबरदस्त वाढ झालेली असली तरी गेल्या काही वर्षांत या कंपन्या बाजारात कामगिरीत पिछाडीवर राहिलेल्या आहेत. बँक ऑफ जपानच्या पतपुरवठा धोरणातील बदल आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर गुंतवणूकीचे हे धोरण चमकदार कामगिरी बजावण्याचे तातडीचे संकेत आम्हाला गेल्या काही महिन्यांत दिसून आले आहेत,”
योजनेतील किमान प्रत्येकी 25 टक्के निधी ल़ार्ज, मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतविला जाणार आहे. तर शिल्लक 0 ते 25 टक्के निधी या तिघांपैकी कोणत्याही एका अथवा सर्व तिन्ही प्रकारात संधी मिळताच गुंतविला जाणार आहे. याबरोबर फंडातील काही निधी ( 25 टक्क्यांपर्यंत) डेट प्रकारात, 10 टक्क्यांपर्यंतचा निधी रिटस् आणि इनव्हीट्स आणि 20 टक्क्यांपर्यंतचा निधी विदेशातील इटीएफसह तेथील समभागांत गुंतविण्याची सुध्दा तरतूद या फंडात आहे.
फंड़ातील समभाग गुंतवणूक विवेक शर्मा, आनंदा पदनाभन अंजेनयन (Anandha Padmanabhan Anjeneyan) आणि उत्सव मेहता हे तर डेट गुंतवणूक पुनीत पाल हे सांभाळणार आहेत.
पीडीआयएम इंडिया अॅसेट मॅनेजमेंटच्या इक्विटी विभागाचे फंड व्यस्थापक विवेक शर्मा याप्रसंगी म्हणाले, “बाजार भांडवली मूल्यामध्ये चांगल्या दीर्घकालीन संधी उपलब्ध असून त्यांचा भारताच्या सध्याच्या वाढीच्या वातावरणात लाभ घेता येईल. हा फायदा उचलण्यासाठी काळजीपूर्वक समभागांची निवड करणे आणि संतुलित पोर्टफोलिओ उभा करण्याची आवश्यकता आहे. सर्व बाजार भांडवली मूल्यामध्ये नेहमी गुंतवणूक असणे अत्यावश्यक असून ती उपलब्ध संधींनुसार योग्यरित्या बदलत असते. हेच ध्येय साध्य करण्याचे पीजीआयएम इंडिया मल्टी कॅप फंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे,”
मल्टी कॅप रणनीतीमध्ये मिड आणि स्मॉल-कॅप विश्वातील नामांकित तसेच उदयोन्मुख त्याचबरोबर वेगाने वाढणाऱ्या या दोन्ही क्षेत्रांमधील गुंतवणुकीसाठी संतुलित दृष्टीकोन समाविष्ट करण्यात आलेला आहे, वेगवेगळ्या बाजार भांडवली मूल्यामध्ये नवनवीन आघाडीच्या कंपन्या सतत समोर .येत असल्यामुळे मल्टी कॅप फंड आकाराची पर्वा न करता संकल्पनाचा फायदा घेणाऱ्या विविध मार्केट कॅपमध्ये शिस्तबद्ध गुंतवणूकीची संधी प्रदान करतो. *आमचे संशोधन असे दर्शवते की, निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 TRI ने 31 डिसेंबर 05 ते 31 जुलै 24 या कालावधीतील गेल्या 19 पैकी 11 वर्षांमध्ये निफ्टी 500 TRI पेक्षा सरस आणि बहारदार कामगिरी केलेली आहे.
पोर्टफोलिओ बांधणीचा दृष्टीकोन तळापासून शिखराकडे आणि वैविध्यपूर्ण असा ठेवण्यात आलेला आहे. बाजाराच्या परिस्थितीला अनुसरून अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन वाढीच्या संधींमध्ये समायोजन करण्यासाठी फंड वाजवी किंमतीवर केंद्रित वाढीचे (GARP) लवचिक धोरण स्वीकारतो. हे धोरण बदल घडविणाऱ्या संकल्पना, घटनांवर आधारित संधी आणि मध्यम ते दीर्घ मुदतीत कमाईच्या वाढीमुळे गती दर्शविणाऱ्या समभागांत निधी गुंतवू शकते. भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेल्या संरचनात्मक बदलांमुळे उदयास येत असलेल्या आरोग्यसेवा, आर्थिकीकरण, गतिशीलता, उपभोग, नवीन ऊर्जा यासारख्या संकल्पनांचा फायदा उठविण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे.
