Tata AIA तर्फे ‘संपूर्ण रक्षा प्रॉमिस’ योजना सादर
मुंबई : आपल्या सर्वांचेच कुटुंबाला नेहमीच प्रथम प्राधान्य असते. कुटुंबाचाच एक भाग असताना आपण नेहमीच आपल्या कुटुंबीयांना आनंदी ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतो. मात्र, एवढे करून थांबत नाही, तर आपल्या अनुपस्थितीतही त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करणारी मालमत्ता निर्माण करण्याच्या दिशेने आपण काम करतो. टर्म इन्शुरन्स हा उपाय म्हणूनच येथे आत्यंतिक प्रसंगोचित बनतो. घरातील कमावत्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्यावेळी प्रियजनांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याची मूलभूत मानवी गरज यामुळे पूर्ण होते. तथापि, टर्म इन्शुरन्स हा केवळ आर्थिक संरक्षण उपायच आहे असे नाही, तर त्यापेक्षाही त्याचे खूप जास्त महत्त्व आहे.
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या विमा कंपनीने नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये आणि लाभ असलेली नवीन टर्म इन्शुरन्स ‘संपूर्ण रक्षा प्रॉमिस’ जाहीर केली आहे.
- कुटुंबप्रमुखाच्या निधनामुळे कुटुंबाला तातडीचा खर्च करावा लागू शकतो, हे लक्षात घेऊन या योजनेत मृत्यूच्या दाव्याच्या सूचनेवर* ३ लाख रु.चे त्वरित पेआउट सादर केले जाते.
- काही वेळा ग्राहकाला वार्षिक प्रीमियम भरण्यात अडचणी येतात. संपूर्ण रक्षा प्रॉमिस पॉलिसीधारकास अशा परिस्थितीत १२ महिन्यांपर्यंत प्रीमियम पुढे ढकलण्याची परवानगी देते.
- जीवघेण्या आजाराचे निदान झाल्यावर उदा.कर्करोग झाल्यास ग्राहकाला विम्याच्या रकमेच्या 50% रक्कम दिली जाते. भविष्यातील प्रीमियम्स माफ केले जातात आणि तरी पॉलिसीचे फायदे मिळत राहतात.
संपूर्ण रक्षा प्रॉमिसबाबत भाष्य करताना टाटा एआयएचे अध्यक्ष आणि मुख्य वित्तीय अधिकारी समित उपाध्याय म्हणाले, “टर्म इन्शुरन्स एक श्रेणी म्हणून अनेक वर्षांपासून ग्राहकांना आर्थिक सुरक्षा पुरवित आहे. तथापि, कालांतराने ग्राहक त्यांच्या विमा योजनेमधून सक्षम क्लेम पेमेंटच्या पलीकडे जाऊन अधिक शोधू लागले आहेत. Tata AIA मध्ये आमच्या ग्राहकांच्या सतत बदलत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आमची नवीन टर्म इन्शुरन्स योजना ‘संपूर्ण रक्षा प्रॉमिस’ दाव्याच्या सूचनेवर त्वरित पेमेंट, प्राणघातक आजाराचे निदान झाल्यास सम अॅश्युअर्ड रकमेच्या 50% रक्कम मिळणे आणि पॉलिसीचे लाभ चालू असताना, भविष्यातील सर्व प्रीमियम्स माफ केले जाणे, यांसारख्या ग्राहकांच्या नावीन्यपूर्ण विशिष्ट गरजा पूर्ण करते. हा आमच्या ग्राहकांना फिकरमुक्त जीवन (चिंता मुक्त) जगण्यास आणि कोणत्याही परिस्थितीत तैय्यार (तयार) राहायला मदत करण्याचा एक प्रयत्न आहे.”
संपूर्ण रक्षा प्रॉमिस दोन योजना पर्यायांसह १०० वर्षांपर्यंतचे संरक्षण पुरविते:
- लाइफ प्रॉमिस – ग्राहक खरेदी करताना विशिष्ट विमा रक्कम निवडू शकतात. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर ती रक्कम देय असते.
- लाइफ प्रॉमिस प्लस – लाइफ प्रॉमिस ऑप्शनला अशाच प्रकारचा डेथ बेनिफिट मिळतो. पुढे जेव्हा पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत हयात असेल, तर तेव्हा एकूण प्रीमियमच्या 100% (मोडल प्रीमियम आणि सूट वगळता) रक्कम परत दिली जाते.
दोन्ही पर्यायांमध्ये पेयर अॅक्सिलरेटर बेनिफिट सादर केला जातो. जीवघेण्या आजाराचा क्लेम झाल्यास बेस सम ॲश्युअर्डच्या ५०% एकरकमी रक्कम दिली जाते. पुढे क्लेम पेमेंट झाल्यानंतर भविष्यातील सर्व प्रीमियम्स माफ केले जातात. विमा योजनेचे लाभ मिळत राहतात.
लाइफ स्टेज (जीवनातील महत्त्वपूर्ण टप्पे) लाभ
उत्पादनामध्ये लाइफ स्टेज सुविधाही आहे, जी पॉलिसीधारकांना लग्न, बाळंतपण/दत्तक घेणे किंवा गृहकर्ज घेणे यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर कव्हरेज वाढविण्यास अनुमती देते. या सुविधेचा लाभ खालील घटना घडल्यापासून १८० दिवसांच्या आत घेता येऊ शकतो.
विवाह – ५०%
जन्म/दत्तक घेणे: पहिले आणि दुसरे मूल: २५%.
गृहकर्ज वितरण: १००%, मंजूर गृहकर्ज रकमेच्या अधीन.
तीन पॉलिसी वर्षांचा प्रतीक्षा कालावधी पूर्ण केल्यानंतर आयुर्विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, क्लेम नोंदणी तारखेपासून १ कार्यालयीन कामकाज दिवसाच्या आत विम्याच्या रकमेतून ३ लाख रुपयांचा* अॅक्सीलरेटेड इन्स्टंट डेथ बेनीफिट दिला जाईल. दाव्याची तपासणी पूर्ण झाल्यावर, उर्वरित विमा रक्कम मिळेल.
फ्लेक्सी पे बेनिफिट वैशिष्ट्यांतर्गत, पॉलिसीधारक देय तारखेपासून १२ महिन्यांपर्यंत देय प्रीमियम पुढे ढकलू शकतो. असे करतानाही बेस प्लॅन आणि संलग्न रायडर्स असेल, तरी संपूर्ण जोखीम कव्हर राखले जाते. या वैशिष्ट्यासाठी कोणताही अतिरिक्त प्रीमियम नाही.
उत्पादन विविध ग्राहक विभागांना खालील सवलती देत आणखी आकर्षक बनवते:
- ऑनलाइन खरेदी केलेल्या पॉलिसींवर पहिल्या वर्षाच्या प्रीमियमवर १०% डिजिटल सूट
- पहिल्या वर्षाच्या प्रीमियमवर पगारदार ग्राहकांना ५% सूट
- जीवनातील महत्त्वाचे टप्पे गाठल्यावर लागू असलेल्या पहिल्या वर्षाच्या प्रीमियमवर 2% ची अनोखी “माईलस्टोन सवलत”. लग्न, बाळंतपण/दत्तक घेणे, पहिली नोकरी मिळविणे आणि गृहकर्ज घेणे हे पात्र टप्पे आहेत.
- पुरुषांच्या तुलनेत महिलांचा प्रीमियम १५% कमी आहे
मान्यताप्राप्त वैद्यकीय तज्ञांच्या स्थानिक आणि जागतिक नेटवर्कमध्ये अॅक्सेस मिळवून ग्राहक जगप्रसिद्ध, Medix कडून पर्सनल मेडिकल केस मॅनेजमेंट (वैयक्तिक वैद्यकीय केस व्यवस्थापन) (PMCM) सेवाही घेऊ शकतात. कोणत्याही गंभीर आजाराच्या बाबतीत ही नि:शुल्क सेवा ग्राहकांना वैद्यकीय स्थितींबद्दल जाणकारांकडून दुसरे मत मिळवून योग्य काळजी घेण्यास मदत होते.
