Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

गौरी केंजळे यांना ‘आदर्श ज्योतिष शिक्षिका’ पुरस्कार

पुणे : पुण्यातील ज्योतिष मार्गदर्शक सौ.गौरी केंजळे यांना ‘कै.शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार ‘ बी.जी. पाचारणे ,जानकी पाचारणे,चंद्रकांत शेवाळे,सौ.पुष्पलता शेवाळे या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.आचार्या सौ.गौरी कैलास केंजळे या कृष्णमूर्ति (केपी) बेसिक अँड एडव्हान्स, मोबाईल न्युमरॉलॉजी रेमेडिज, मेडिकल न्यूमरॉलॉजी, क्रिस्टल विषयाच्या मार्गदर्शक आहेत.’गौरी कैलास ज्योतीष संस्थे’च्या त्या संचालक आहेत.

मोबाईल न्यूमरॉलॉजी, सुलभ कृष्णमूर्ती( केपी), क्रिस्टलच्या अद्भुत दुनियेत, फलादेशाचे तंत्र ( उपयुक्त पायऱ्या) या ग्रंथाच्या त्या लेखिका आहेत. भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्रा.रमणलाल शहा ज्योतिष अॅकॅडमी आयोजित ४२ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात २१ ऑगस्ट रोजी हे पुरस्कार वितरण पार पडले. कैलास केंजळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading