Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडीत एमआयएम ची एंट्री ?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून सन्मानजनक जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीत सहभागी होण्याची तयारी एमआयएम ने दाखवली आहे.

एमआयएमचा मुस्लिम मतदारांवर मोठा प्रभाव आहे. मुंबईसह राज्यभरात मुस्लिम मतदान निर्णायक ठरणारे अनेक मतदारसंघ आहेत. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडी झाल्यास त्याचा आघाडीला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे एमआयएम महाविकास आघाडीत सहभागी झाल्यास त्यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे पक्षाच्या कक्षा रुंदावून प्रतिमा अधिक व्यापक करण्यासाठी एमआयएमला आघाडीचा उपयोग होऊ शकतो.

लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येण्याच्या दृष्टीने चाचपणी केली. मात्र हे समीकरण आकाराला आले नाही. एमआयएमचे छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार इम्तियाज जलील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत 31 जागा मिळवलेल्या महाविकास आघाडी एमआयएम सहभागी झाला तर राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागू शकते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading