Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

गोदरेज प्रॉपर्टीजतर्फे #WhereTrustResides  हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम लाँच

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) या भारतातील आघाडीच्या स्थावर मालमत्ता कंपनीने #WhereTrustResides हा व्हिजनरी उपक्रमाची घोषणा केली आहे. घरखरेदी हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून, ग्राहक प्रामुख्याने काळ आणि वारशाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या ब्रँडला पसंती देतात. उंचावलेली जीवनशैली, डिझायनर घरे आणि उच्चभ्रू सुविधांकडे आजच्या ग्राहकांचा कल असला, तरी सर्वात पहिले प्राधान्य एकाच गोष्टीला आहे, तो म्हणजे विश्वास.

घर खरेदीचा प्रवास संदिग्धता आणि अनिश्चिततेने वेढलेला आहे व गोदरेज प्रॉपर्टीजला असे वाटते की, या भावनेला विश्वासार्हता देण्याची गरज आणि जबाबदारी दोन्ही आहे. त्यासाठी रियल इस्टेटचे जग जास्त सुलभ करता येईल किंवा ग्राहकांना या प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर कोणत्या योग्य गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे, या विषयी शिक्षित करता येईल. त्यासाठी ब्रँडने दिया नावाच्या नऊ वर्षांच्या मुलीची व्यक्तिरेखा लाँच करत, एक अभिनव दृष्टिकोन दर्शविला आहे.

या कॅम्पेनचा एक भाग म्हणून ब्रँडने जिज्ञासू आणि आजच्या सर्व घर खरेदीदारांच्या आनंद, अस्वस्थ उत्सुकता किंवा तीव्र शंकाकुशंका अशा जाणिवांचे प्रतीक असलेल्या ‘दिया’चा समावेश असलेला डिजिटल व्हिडीओ लाँच केला आहे. यातली गोष्ट दियाच्या कोणतेही फिल्टर नसलेला दृष्टिकोन वापरून रियल इस्टेट जगाचा शोध घेण्यातून होते व त्याची सुरुवात तिच्या आई-वडिलांनी गोदरेजचं घर खरेदी केल्यामुळे होते. या ब्रँडवर तिच्या पालकांचा विश्वास असला, तरी तिचा विश्वास मिळविणं जरा अवघड आहे. उत्सुकतेनं भरलेलं मन आणि सकारात्मक हृदय, शिवाय कोणतेही फिल्टर नसलेला दृष्टिकोन यांच्या मदतीने ती गोदरेज खरंच आपलं स्वप्नातलं घर आहे का, याचा शोध सुरू करते. या प्रवासात गोदरेज प्रॉपर्टीज घर खरेदीदारांच्या शंकांचे निरसन करून लोकांचा विश्वास मिळवितात.

 #WhereTrustResides

कॅम्पेनच्या पहिल्या टप्प्यात दियाच्या निरागस उत्सुकतेमुळे इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि लिंक्डइनसारख्या सोशल मीडियावरील व्ह्यूज १०० दशलक्षांपर्यंत पोहोचले आहेत.

या कॅम्पेनविषयी गोदरेज प्रॉपर्टीज लि.चे प्रमुख विपणन अधिकारी ललित मखिजानी म्हणाले, ‘घर खरेदीच्या प्रवासात विश्वास किती महत्त्वाचा आहे, याची गोदरेज प्रॉपर्टीजला कल्पना आहे. #WhereTrustResides आणि दियाचा शोध यांच्या माध्यमातून घर खरेदीदारांचा आवाज उठविण्यासाठी व्यासपीठ तयार करण्याचे व त्यांना पारदर्शक आणि तणावरहीत अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. हे कॅम्पेन घर खरेदीदारांसह विश्वास आणि गुणवत्तेच्या पायावर आधारित प्रदीर्घ नाते निर्माण करण्याच्या आमच्या तत्त्वाशी सुसंगत आहे.’

हे कॅम्पेन गोदरेज प्रॉपर्टीजमधील वेगवेगळ्या भागधारकांसह आकर्षक व्हिडीओजद्वारे दियाच्या आगमनाची उत्सुकता वाढवत सुरू करण्यात आले आणि ही ‘दिया कोण आहे?’ याची उत्सुकता वाढल्यानंतर अचानक फ्रेंडशिप डे रोजी भारतातील वेगवेगळ्या गोदरेज प्रॉपर्टीजच्या परिसरात अचानक एक व्हेंडिग मशिन रहस्यपूर्णरीत्या अवतरले. दियाने गोदरेज कुटुंबातील ४,५०० लोकांसह मैत्री केली आणि चॉकलेट्सबरोबर अविस्मरणीय क्षण घालविले. त्याशिवाय गोदरेज घराबद्दल तिनं आपले विचारही व्यक्त केले.

(https://www.instagram.com/reel/C-u1pLfBd7d/?igsh=N21yb2FsMDBvZnN2)

कॅम्पेनच्या पुढच्या टप्प्यात दिया दर्जा, विचारपूर्वक निर्णय, शाश्वतता, कम्युनिटी बिल्डिंग अशा ब्रँडच्या विविध पैलूंचा शोध घेताना दिसेल. #WhereTrustResides उपक्रमातून गोदरेज प्रॉपर्टीजचे घर खरेदी प्रक्रियेचे रुपांतर एका आनंदी आणि समृद्ध अनुभवात करण्याची व पर्यायाने रियल इस्टेट क्षेत्रातील विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपले स्थान आणखी बळकट करण्याची बांधिलकी दिसून येते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading