Monday, June 22, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बिग बॉस मराठी’च्या घरातला नवा कल्ला; निक्की अन् इरिनामध्ये मतभेद

Bigg Boss Marathi New Season Day 26 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आजच्या भागात टीम A मधील सदस्यांमध्ये भांडण झालेलं दिसून येणार आहे. पहिल्या दिवसापासूनच सदस्यांमध्ये कल्ला होताना दिसून येत आहे. घरातील कोणत्या सदस्यामध्ये कधी कोणता कल्ला होईल हे सांगता येत नाही. आजच्या भागातही निक्की आणि इरिनामध्ये मतभेद झालेले पाहायला मिळणार आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टीम A मधीला इरिना रूडाकोवा आणि निक्की तांबोळी एकमेकींसोबत चांगलच भिडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये इरिना म्हणत आहे,”मी तुझ्यामागे काहीही बोलले नाही”. यावर निक्की म्हणते,”मी तुझ्यापद्धतीने घरात का वागू”. त्यावर इरिना म्हणते,”तुला काय करायचं ते कर”. इरिनाला उत्तर देत निक्की म्हणते,”सगळ्यांना विकून खाणारी आहेस तू… हिला तिच्या देशात रिजेक्ट केलंय म्हणून आली आपल्या देशात आणि आपल्या शोमध्ये”.

निक्की आणि इरिनामध्ये नक्की काय वाद झालाय हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग नक्की पाहा. ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading