Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

भाऊच्या धक्क्यावर सदस्यांसमोर येणार महाराष्ट्राचा मूड

 

‘BIGG BOSS मराठी’, भाऊचा धक्का, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

Bigg Boss Marathi New Season : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य काहीही झालं की ‘महाराष्ट्र बघतोय’ हा डायलॉग हमखास मारत असतात. खरं तर महाराष्ट्र खरचं बघतोय सदस्य कशाप्रकारे खेळत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात रितेश भाऊ ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांना पहिल्यांदाच महाराष्ट्र काय बघतोय, महाराष्ट्राचा मूड काय आहे हे दाखवणार आहे.

प्रोमोमध्ये रितेश भाऊ म्हणतोय,”मी तुम्हाला दाखवणारे तुमच्याबद्दल महाराष्ट्र काय बोलतोय ते”. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या कमेंट्स वाचताना सदस्य दिसून येतात. वैभव कमेंट वाचतो की,”सगळ्यात कमजोर दोन खेळाडू म्हणूजे घन:श्याम आणि वैभव”. पुढे अभिजीत कमेंट वाचतो,”तुझ्यासारख्या पावडरवाल्याला लोळवला”, डीपी वाचतो की “निक्की गँगसोबत भिड”. त्यावर स्पष्टीकरण देत डीपी म्हणतो,”अजून मी कोणासोबत भिडलेलोच नाही”. एकंदरीतच आजच्या भागात सदस्यांना महाराष्ट्राला त्यांच्याविषयी वाटत असलेलं मत कळणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील खाष्ट सासू कोण?

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज अक्षय केळकर, गायत्री दातार आणि पायल जाधव हे ‘अबीर गुलाल’ मालिकेतील कलाकार जाणार आहेत. त्यावेळी ते सदस्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीतील ट्रॉफी द्यायला लावतील. दरम्यान ‘खाष्ट सासू’ची ट्रॉफी निक्की वर्षा उसगांवकरांना देताना दिसून येईल.

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM #BhauchaDhakka

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading