सौभाग्य आणि सूडाच्या संघर्षाची कहाणी ‘दुर्गा’; रुमानी खरेची दमदार भूमिका
‘कलर्स मराठी’च्या नव्या प्रवासाचा ‘दुर्गा’ ही नवी मालिका भाग आहे. काही दिवसांपूर्वी ‘दुर्गा’ मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला. या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आपल्या कुटुंबाचं सुख हिरावून घेतलेल्या माणसाचा बदला घेण्यास निघालेल्या एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट प्रेक्षकांना ‘दुर्गा’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ज्या घराचा उंबरठा तिने ओलांडला आहे, त्यांच्याच विरोधात आपल्याला लढायचं आहे हे कळल्यानंतर दुर्गा कसा मार्ग काढणार हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पाहा.
दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकणार असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारणार आहे. तसेच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्र देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. ही नवी कोरी गोष्ट ‘दुर्गा’ 26 ऑगस्टपासून संध्या. 7:30 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
येतेय नवी कोरी गोष्ट ‘दुर्गा’ 26 ऑगस्टपासून संध्या. 7:30 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!
