Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला ताब्यात घेण्याचा मार्ग भारतासाठी खुला

नवी दिल्ली:  २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी मूळ पाकिस्तानी असलेला कॅनडातील व्यावसायिक तहव्वूर राणा याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा मार्ग भारतासाठी खुला झाला आहे. आरोपी प्रत्यार्पण करारानुसार राणा याला भारताच्या ताब्यात दिले जाऊ शकते, असा निकाल अमेरिकेतील यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर नाइंथ सर्किट या न्यायालयाने दिला आहे. 

यापूर्वी कॅलिफोर्निया येथील जिल्हा न्यायालयाने हीच बाब स्पष्ट केली होती. मात्र, जिल्हा न्यायाधीशांच्या त्या निकालाच्या विरोधात प्राणायाने वरील न्यायालयात अपील केले होते. राणा याच्यावर अमेरिकन न्यायालयात दाखल असलेल्या आरोपातून न्यायालयाने त्याची मुक्तता केली आहे. त्यामुळे आता त्याला भारताकडे सोपविण्याचे कोणतेही कारण नाही, असे राणा याचे म्हणणे होते. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही. 

आरोपीची ज्या गुन्ह्यांसाठी मागणी केली आहे, त्याच गुन्ह्यात अमेरिकेतील न्यायालयाने आरोपीला शिक्षा केली असेल अथवा निर्दोष मुक्तता केली असेल, अशा आरोपींना प्रत्यर्पित करण्याची मागणी करता येत नाही. 

भारतात राणा याच्यावर दाखल असलेले गुन्हे हे अमेरिकन न्यायालयाने ज्या आरोपातून राणा याची मुक्तता केली आहे त्या आरोपांपेक्षा भिन्न प्रकारचे आहेत. त्यामुळे प्रत्यारपणाच्या करारात राणा याचा अपवाद करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राणा याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा भारताचा मार्ग प्रशस्त झाला आहे. अर्थात, या निकालाच्या विरोधात आणखी वरच्या न्यायालयात अपील करण्याची संधी प्राणायाला उपलब्ध आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading