Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत – अजित पवार

पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात निधीची रक्कम पोहोचली आहे. त्यामुळे आजचा दिवस अधिक महत्त्वाचा आहे.  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना देण्यात आलेली रक्कम ही भाऊ म्हणून दिलेली ओवाळणी आहे. ती तुमची तुमच्याकडेच राहणार आहे. ती कोणी काढून घेऊ शकत नाही. कोणी काही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभा प्रसंगी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री व नेते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, आणखी पाच महिने सरकारच्या हातात आहेत. या सर्व कालावधीतील निधी दरमहा आपल्यापर्यंत पोहोचेल. तुमची अशीच साथ मिळाली तर यापुढेही तुमच्यासाठी आम्हाला काही करता येईल. या योजना सुरू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे, असे सांगत अजितदादा उपस्थित भगिनींना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.

राज्यातील महिला सबल झाल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत अशी आपल्या सरकारची भावना आहे. महिलांच्या हितासाठी आपण चार धोरणे अमलात आणली. विविध योजना प्रत्यक्षात उतरवल्या. महिलांना मानसन्मान दिला. प्रतिष्ठा दिली. विविध पदांवर त्यांची नियुक्ती केली. महिलांनी या संधीचे सोने करून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले आहे, असेही पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading