Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

कल्पतरू लिमिटेडने सेबीकडे फाइल केले डीआरएचपी

डीआरएचपी लिंक: https://www.icicisecurities.com/Upload/ArticleAttachments/Kalpataru%20Limited_DRHP.pdf

कल्पतरू लिमिटेडने (“DRHP) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे. कल्पतरू लिमिटेड ही महाराष्ट्रातील मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (“MMR”) मधील एक प्रमुख रिअल इस्टेट डेव्हलपर आहे आणि (स्रोत: ॲनारॉक रिपोर्ट) एमएमआरमधील सर्व छोट्या बाजारपेठांमध्ये उपस्थित आहे. कंपनी ही एक एकीकृत रिअल इस्टेट विकास कंपनी आहे जी रिअल इस्टेट विकासाशी संबंधित सर्व प्रमुख कार्यामध्ये गुंतलेली आहे, ज्यामध्ये जमीन शोधणे आणि संपादन करणे (किंवा विकासाचे अधिकार), नियोजन, डिझाइन, अंमलबजावणी, विक्री आणि त्यांच्या प्रकल्पांचे विपणन समाविष्ट आहे.

कंपनीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये ₹ 15,900 दशलक्ष पर्यंतच्या नवीन इश्यूचा समावेश आहे.

कंपनी आणि त्यांच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या काही कर्जाच्या पूर्ण किंवा अंशतः परतफेड/पूर्व-पेमेंटसाठी निव्वळ उत्पन्नाचा वापर करण्याचा आणि काही निधी सामान्य कॉर्पोरेट कार्यांसाठी वापरण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेएण फायनान्शियल लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायजरी अँड सेक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading