Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

बिग बॉस मराठी’मधील सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला; घरच्यांना फोन लावताच ढसाढसा रडले

 

Bigg Boss Marathi New Season Day 20 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज अश्रूंचा महापूर येणार आहे. भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेलं पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचे दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कधी कोणाचा दुश्मन होईल हे सांगणं कठिण आहे. त्यामुळे सदस्यांना आपल्या कुटुंबियांची आठवण येणं स्वाभाविक आहे.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे. घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडताना दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”सदस्यांनी साधला जीवलंगासोबत आपुलकीचा संवाद”.

‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग पाहताना ‘बिग बॉस’प्रेमींनादेखील अश्रू अनावर होणार आहेत. नेहमी एकमेकांसोबत भिडणारे सदस्य आजच्या भागात आपल्या माणसांकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहेत.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading