एआय ने सुसज्ज आधुनिक घरांची नव्याने कल्पना करताना: ६० टक्के भारतीय ग्राहकांनी एआय ची परिवर्तनकारी शक्ती ओळखली आहे
गुरुग्राम : भारतीय ग्राहकांचा एक लक्षणीय भाग आता एआय – सुसज्ज डिजिटल अप्लायन्सेस खरेदी करण्याचा विचार करत असल्याचे निरीक्षण भारताचा सर्वात मोठा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड सॅमसंगने आज मांडले. सॅमसंग इंडियाने हाती घेतलेल्या एका संशोधनातून हाती आलेल्या निष्कर्षांनुसार ६० टक्के ग्राहकांना डिजिटल अप्लायन्सेसमधील एआय तंत्रज्ञानाच्या परिवर्तनकारी शक्तींचा अंदाज आलेला आहे, ज्यामुळे त्यांना एका स्मार्ट घराचा अनुभव मिळविण्यामध्ये मदत होईल.
सॅमसंग इंडियाने केलेल्या या पाहणीत सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी ४७ टक्के प्रतिसादकांनी एआय तंत्रज्ञानावर चालणाऱ्या वैशिष्ट्यांनी वाणसामान भरण्याची आठवण करून देणे आणि पाककृतींची शिफारस करणे यांसारख्या दैनंदिन कामांना हाताळण्यात आपली मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली. कुतूहल वाढविणारा आणखी एक कल म्हणजे या एआय -सुसज्ज डिजिटल उपकरणांविषयी सर्वाधिक उत्साह मिल्येनियल्सच्या पिढीने व्यक्त केला; या पाहणीसाठी मुलाखतीत सहभागी झालेल्या एकूण व्यक्तींपैकी जवळ-जवळ ५० टक्के व्यक्तींनी एआय -सुसज्ज डिजिटल उपकरणे विकत घेण्याची आपली इच्छा असल्याचे सांगितले. AI तंत्रज्ञानाने आपल्याला अधिक चांगला जीवनानुभव देण्यासाठी खऱ्याखुऱ्या जीवनाशी निगडित अॅप्लिकेशन्स अधिक प्रमाणात आणली पाहिजेत, असे मतही मिल्येनियल्सनी या मुलाखतींदरम्यान व्यक्त केले.
“आपल्या स्मार्ट उपकरणांनी आपल्या गरजांना समजून घेण्याची आणि आपली कामे व काम करण्याची शैली अंगिकारण्याची वेळ आता आली आहे. बिस्पोक एआय तंत्रज्ञान ग्राहकांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या समस्या सोडविण्याचे काम करेल. जसे की, वॉशिंग मशीनसह विविध डिजिटल उपकणांसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेची बचत केली जाईल आणि घरापासून दूर असतानाही आपल्या घरावर नियंत्रण ठेवण्याची ताकद ग्राहकांच्या हाती देऊन कपडे धुण्याचे काम चिंतामुक्त पद्धतीने पुरे करून देईल. या वर्षाच्या सुरुवातीला बिस्पोक एआय मंच ग्राहकांसाठी खुला झाल्यापासून ग्राहकांना घरातील सर्व उपकरणांच्या देखभालीवर सर्वकाळ देखरेख ठेवण्यास सक्रियपणे मदत करण्याचे या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य विशेषत्वाने आवडले आहे…जसे की उपकरणांचे आयुष्य लांबेल याची काळजी घेणारी सॅमसंग स्मार्टथिंग्ज होमकेअर आणि प्रोअॅक्टिव्ह मेन्टेनन्ससारखी वैशिष्ट्ये.” एसआरआय -बेंगळुरूचे मॅनेजिंग डायरेक्टर दिपेश शाह म्हणाले. सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट इंडिया- बेंगळुरू हे सॅमसंगचे दक्षिण कोरियाबाहेरचे सर्वात मोठे संशोधन व विकास केंद्र आहे. कंपनीने केलेल्या संशोधनामधून असेही उघड झाले की, डिजिटल उपकरणांमध्ये – विशेषत: रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशीन्समध्ये – कामगिरी आणि एआय सारखी प्रगत वैशिष्ट्ये व टिकाऊपणा हे ग्राहकांना खरेदीस उद्युक्त करणारे महत्वाचे घटक ठरतात. उत्पादनासोबत मिळणाऱ्या वॉरंटीकडे ग्राहक टिकाऊपणाच्या दृष्टीने विचारात घ्यायची एक महत्त्वाची गोष्ट मानतात.
ग्राहकांच्या या प्राधान्यक्रमानुसार सॅमसंगने आधीच आपल्या होम अप्लायन्सेसच्या संपूर्ण श्रेणीमध्ये एआय चा अंतर्भाव केला आहे, ज्यामुळे दैनंदिन कामांवर खर्च होणारा वेळ बऱ्यापैकी वाचत आहे. सॅमसंगची बिस्पोक एआय होम अप्लायन्सेस म्हणजे आधुनिक डिजिटल उपकरणांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या अंतर्भावाविषयीचा ग्राहकांचा उत्साह, आशा-आकांक्षा यांचे मूर्त उदाहण आहे. इनबिल्ट वाय-फाय आणि एआय चिप्स यांच्या साथीने बिस्पोक एआय वैशिष्ट्य वापरणारी सॅमसंगची नवी उपकरणे अखंड गृहव्यवस्थापनाची सुविधा देऊ करतात आणि अधिक चांगली सुरक्षा, शाश्वतता व उपलब्धता देत जीवनमानामध्ये सुधारणा घडवून आणतात.
एआय व्हिजन, एआय व्हॉइस आणि एआय डेटा टेक्नोलॉजी यांचा वापर करून सॅमसंग असे नवीन अनुभव देऊ करते, जिथे घरगुती उपकरणे स्वत:हून नियंत्रणात ठेवण्याजोगी आणि जोडली गेलेली आहेत. सॅमसंगसाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे पर्यावरणीय शाश्वतता, जी स्मार्टथिंग्ज एनर्जीसारख्या वैशिष्ट्यामधून दिसून येते. यात यूजर्सना या तंत्रज्ञानाशी जोडलेल्या उपकरणांसाठी वापरल्या जाणाऱ्या वीजेवर देखरेख आणि नियंत्रण ठेवता येते. एआय एनर्जी मोडमध्ये वीजवापराच्या पद्धतीच्या आधारे एआय अल्गोरिदम्सचा वापर केला जातो आणि वॉशिंग मशीन्सच्या वापरामध्ये ७० टक्क्यांपर्यंत वीजबचत होऊ शकते. यातून एआय अनुभवाशी निगडित कनेक्शन अर्थात जोडलेपण, कन्व्हिनियन्स अर्थात सोय आणि कस्टमायझेशन अर्थात व्यक्तीविशिष्ट सेवा असे ३ ‘सी’ साधले जातात.
सॅमसंगची बिस्पोक एआय होम अप्लायन्सेस सुधारित कनेक्टिव्हिटी आणि व्यक्तीगत अनुभव देऊ करत स्मार्ट होम अनुभवामध्ये क्रांती घडवून आणत आहेत. नवसंकल्पनांचा शोध आणि शाश्वततेप्रती सॅमसंगची समर्पितता व त्याला मिळालेली एआय ची साथ यामुळे गृहोपयोगी उपकरणांमध्ये दर्जाची नवीन मानके प्रस्थापित झाली आहेत व या उपकरणांच्या साथीने दैनंदिन आयुष्य अधिक स्मार्ट, अधिक कार्यतत्पर आणि निसर्ग-स्नेही बनत आहे.
