Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNE

सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणीत पहिले स्थान

पुणे  : सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला (एसएसपीयू) नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणीत पहिले स्थान मिळाले आहे. हे प्रतिष्ठित रँकिंग 12 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित एका कार्यक्रमात प्रसिध्द करण्यात आले. केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमात इंडिया रँकिंग 2024 चे अनावरण धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च शिक्षण सचिव के.संजय मुर्थी,युजीसी अध्यक्ष प्रा.एम.जगदेश कुमार ,एआयसीटीई चे अध्यक्ष प्रा.टीजी सीतारामण,एनईटीएफचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुध्दे,एनबीए सदस्य सचिव डॉ.अनिलकुमार नस्सा ,उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव सुनील कुमार बर्नवाल,सहसचिव गोविंद जैसवाल व शिक्षण क्षेत्रातील इतर दिग्गज मंडळी उपस्थित होते.

एनआयआरएफ हे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) मधील एक महत्त्वाचा भाग असून या रँकिंग्समध्ये अध्यापन,अभिनवता,संशोधन, पदवीचे निकाल इत्यादी महत्त्वाच्या बाबींमध्ये उत्कृष्टता दर्शविणाऱ्या सर्वोच्च संस्थांचा समावेश आहे.यावर्षी प्रथमच एनआयआरएफ रँकिंगमध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणी सादर करण्यात आली आणि या नव्याने सुरू झालेल्या श्रेणीत सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ने पहिले स्थान मिळविले.

सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार म्हणाल्या की,मा.शिक्षणमंत्री श्री.धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने हा सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. हे यश आमचे विद्यार्थी,प्राध्यापक व कर्मचारी यांच्यासह विद्यापीठाशी संबंधित प्रत्येकाचे कठोर परिश्रम आणि समर्पण दर्शवितो.आम्हाला हा सन्मान मिळाल्याचा अभिमान असून या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार व्यक्त करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading