Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

बी प्राक आणि सनी कौशल या गाण्यासाठी येणार एकत्र !

 पॅन-इंडिया अष्टपैलू गायक बी प्राक त्याच्या पुढील सिंगल साठी सज्ज होत असताना ‘मुक्के पाये सी’ हे नवीन गाण घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन भर्या’ने प्रेक्षकांवर एक अनोखी छाप पाडली होती आणि हे गाणं देखील तितकच खास असणार असल्याचं कळतंय. देसी मेलोडीजवर प्रदर्शित होणाऱ्या या गाण्यात सनी कौशल आणि नेहा शर्मा दिसणार असू शकतो गायक बी प्राक आणि अभिनेता सनी आणि नेहासोबतचे हे पहिले सहकार्य आहे. विशेष म्हणजे बी प्राकने याआधी सनीचा भाऊ विकी कौशलसोबत ‘बडा पचताओगे या चार्टबस्टरसाठी काम केले होते.
गाण्याबद्दल बोलताना बी प्राक म्हणतो “जेव्हा मी पहिल्यांदा ही रचना ऐकली, तेव्हा मी भारावून गेलो होतो. मी यापूर्वी केलेल्या गाण्यापेक्षा हे गाणं नक्कीच वेगळ आहे. मला खात्री आहे की माझे या गाण्याला प्रेक्षक खूप प्रेम देतील”
 गाण्याच्या विश्वात अनेक दमदार हिट्स देण्याच्या बी प्राकच्या कौशल्यानुसार हे नवीन गाण देखील मागील सर्व विक्रम मोडतील अस कळतंय. शेरशाहचा ‘रांझा’ आणि ॲनिमलचा ‘पापा मेरी जान’ यांसारख्या भावनिकरित्या गाण्याची अनोखी पर्वणी त्याने आधी दिली आहे. बी प्राक ‘मुक्के पाये सी’ गाण्यात अनेक भावनांना एकत्र घेऊन येणार यात शंका नाही.
 सध्या बी प्राक त्याच्या ‘कांगुवा’ मधील ‘फायर’ या नवीन ट्रक साठी चर्चेत आहे. या गाण्याने राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी यांच्या ‘सरिलेरू नीकेव्वरु’ मधील त्यांच्या लोकप्रिय ट्रॅक ‘सुर्युडिवो चंद्रुदिवो’ नंतर त्यांचे दुसरे सहकार्य म्हणून चिन्हांकित केल. आगामी काळात तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स करणार आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading