हिंजवडी माण फेज ३ मेगा पॉलिस ते सांगवी नवीन बस मार्ग सुरू
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडुन हिंजवडी माण फेज ३ मेगा पॉलिस ते सांगवी (मार्ग क्रमांक – ३७३) हा नवीन
बस मार्ग आज पासून सुरू करण्यात आला आहे. पिंपरी – चिंचवडच्या माजी महापौर माई ढोरे यांच्या हस्ते या मार्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पिंपरी – चिंचवडच्या माजी नगरसेवक शारदा सोनवणे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे,
सामाजिक कार्यकर्ते राजू साळवे व पिंपरी आगाराचे आगारव्यवस्थापक भास्कर दहातोंडे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवासी वर्गाची वाढती मागणीची दखल घेऊन हिंजवडी माण फेज ३ मेगा पॉलिस
ते सांगवी (मार्ग क्रमांक – ३७३) हा नवीन बसमार्ग सुरू केला असुन आय.टी. कर्मचारी व प्रवासी नागरिक यांचे करीता एक
चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे, अशी भावना यावेळी प्रवासी नागरिक यांनी व्यक्त केली.
मार्ग क्रमांक ३७३ – हिंजवडी माण फेज ३ मेगा पॉलिस ते सांगवी या बससेवेचा मार्ग साई चौक नवी सांगवी,
काटेपूरम चौक, पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर चौक, रहाटणीगांव, काळेवाडी फाटा, मानकर चौक, वाकड, इन्फोसिस फेज – १, इन्फोसिस फेज – २, हिंजवडी माण फेज-३ सर्कल, मेगा पॉलिस फेज-३ असा असणार आहे. हिंजवडी माण फेज ३ मेगा पॉलिस ते सांगवी पहिली बस सकाळी ०६.०० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ०६.०० वा. आहे. तसेच सांगवी ते हिंजवडी माण फेज ३ मेगा पॉलिस पहिली बस सकाळी ०७.२० वा. तर शेवटची बस रात्री ०७.२५ वा. आहे.
