Friday, September 25, 2026
Latest NewsPUNE

शिवसृष्टीमध्ये डॉ बाबासाहेब पुरंदरे यांची जयंती साजरी

पुणे : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीमध्ये नुकतीच पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त अमृत पुरंदरे आणि त्यांच्या पत्बी भैरवी पुरंदरे, विनीत कुबेर, डॉ अजित आपटे, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, ‘जाणता राजा’ या महानाट्यातील  कलाकार, तंत्रज्ञ, शिवसृष्टीचा सेवकवर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ‘जाणता राजा’ हे महानाट्य कसे उभे राहिले, त्यामागील उद्देश, बाबासाहेब पुरंदरे यांची यामागील भूमिका आणि भविष्यातील योजना यांची माहिती देणारा व्हिडीओ उपस्थितांना दाखविण्यात आला. उपस्थितांना पेढे वाटप करण्यात आले,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading