Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

दुबईतून येऊन जैन धर्माची शिकवण देत चिमुकली मुलं करत आहेत विज्ञान विषयी जनजागृती

खेळण्या – बागडण्याच्या वयात जैनम व जिविका ने सुरू केले स्टार्टअप

पुणे : बाल वयात विज्ञान हा विषय तसा थोडा अवघड. पण त्याला प्रात्यक्षिकाची जोड दिली तर हाच विषय किती सोपा होतो; हे दुबईतील दोन चिमूकल्या मुलांनी करून दाखवलं आहे. खेळण्याच्या वयात आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहचवण्याच्याउद्देशाने जैनम व जिविका जैन ही दोन १२ व ९ वर्षांची मूलं सध्या देशभर विज्ञान विषयक जनजागृती करताना दिसत आहेत. मुळचे महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील परंतू सध्या दुबईमध्ये स्थायिक असलेल्या जैनम व जीवीका जैन यांनी वेळेचे योग्य नियोजन, इंटरनेट आणि पालकांच्या पाठिंब्यामुळेच विज्ञान विषयक जनजागृती करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. विशेष म्हणजे विज्ञान विषयक जनजागृती करताना जैनम  व जिविका ही दोन मुलं आपल्या बाल वाणीत जैन धर्माची शिकवण देखील देत आहेत.

मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी या लहानशा गावात कांतीलाल जैन यांचे कुटूंब राहते. त्यांचे सुपुत्र धिरज जैन व्यावसायाच्या निमित्याने दुबईला गेले अन् तेथेच स्थायिक झाले. त्यांना जैनम व जिविका ही दोन मुलं आहेत. दोघेही अतिशय सुंदर व चाणाक्ष बुद्धीची. जैन धर्माच्या शिकवणीत वाढलेल्या या दोघांनाही विज्ञान विषयाची खूप आवड होती. यासाठी त्यांनी इंटरनेटचा वापर करीत व वेळेचे योग्य नियोजन करून कमी वेळात अधिक ज्ञान प्राप्त केले. त्यांचे ‘जे जे फन टाइम’ नावाचे त्यांचे युट्यूब चॅनेल देखील आहे. या दोन्ही मुलांमध्ये आपल्या देशाविषयी, संस्कृतीबद्दल खूप आदर व प्रेम आहे. म्हणूनच आपल्या देशासाठी काहीतरी करावे, असे त्यांना वाटत होते. या भावनेने प्रेरीत होवून 50 दिवसात भारतातील विविध शहरांमध्ये, खेडोपाडी जाऊन आपल्या संस्कृती विषयी प्रबोधन करायचे, विज्ञान विषयक जनजागृती करायची असा संकल्प करून ही मुलं  काही दिवसांपूर्वी वडिलांची परवानगी घेऊन आई ममता यांच्यासह भारतात आले. त्यांच्या कार्यक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांनी संकल्प केलेले शंभर कार्यक्रम लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. कार्यक्रमांना मिळणार प्रतिसाद पाहून संकल्प पूर्णत्वास गेल्या नंतरही पुढील काळात असे कार्यक्रम करण्याचा निर्धार जैनम व जिविका यांनी बोलून दाखवला. 

‘ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते’ या वाक्याप्रमाणे विज्ञान अगदी सोप्या भाषेत इतरांना समजून सांगण्यास जैनम व जिविका यांनी सुरुवात केली. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण विदेशातून जे शिक्षण घेऊन आलोय ते भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे हे इतरांना ते सांगू लागले. सध्या जैनम व जिविका हे संपूर्ण देशात विज्ञान विषयक जनजागृती कार्यक्रम घेत आहेत. पुढील काळात जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचे कार्यक्रम पोहोचतील यात शंका नाही.

या विषयी बोलताना धिरज जैन म्हणाले, मोबाईल ही आजची प्राथमिक गरज आहे. आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो. पालक मुलांना डिजिटल पद्धतीने ज्ञान घेण्यासाठी सक्षम करत आहेत. नवीन तंत्रज्ञानाने नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत असतात. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) नव्या गोष्टींना वाव मिळत आहे. असंख्य शैक्षणिक अॅप्स, व्हिडीओ आणि ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने, मोबाईल फोन मुलांना ज्ञानाचा खजिना देऊ शकतात. आम्ही  मुलांच्या हातात मोबाइल देताना त्यांनी कोणत्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत, या बद्दल मार्गदर्शन केले. यातूनच जैनम व जिविका यांनी विज्ञान संबंधी व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. यामधून त्यांची स्टार्टअप कंपनी सुरू झाली आहे. आज  ‘जेजे फनटाइम’  या युट्यूब चॅनेलवर  ४०० पेक्षा जास्त व्हिडीओज आणि  १ लाख पेक्षा जास्त सबस्क्राइबर आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading