सरस्वती सारी डेपो लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 12 ऑगस्ट 2024 पासून सुरू
मुंबई : सरस्वती सारी डेपो लिमिटेडची इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्रीशी संबंधित बोली/ऑफर 12 ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे.
इक्विटी शेअर्सच्या एकूण ऑफरमध्ये (प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य) 6,499,800 इक्विटी शेअर्सपर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 3,501,000 इक्विटी शेअर्सपर्यंतच्या विक्रीची ऑफर यांचा समावेश आहे.
प्रति इक्विटी शेअरसाठी 152 रुपये ते 160 रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 90 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 90 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनीने फ्रेश इश्यूमधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनीला आर्थिक वर्ष 2025 मध्ये साधारणपणे लागणाऱ्या अंदाजे 81 कोटी रु.च्या खेळत्या भांडवलाच्या निधीसाठी, तसेच उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशासाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या 3,501,000 इक्विटी शेअर्सपर्यंतच्या ऑफर फॉर सेलमध्ये तेजस दुल्हानी यांच्यातर्फे 700,200 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; अमर दुल्हानी यांच्यातर्फे 700,200 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; शेवकराम दुल्हानी यांच्यातर्फे 700,200 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सुजनदास दुल्हानी यांच्यातर्फे 700,200 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; तुषार दुल्हानी यांच्यातर्फे 350,100 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि निखिल दुल्हानी यांच्यातर्फे 350,100 पर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
युनिस्टोन कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
