चोला एमएस आणि महिंद्र फायनान्समध्ये मोटर व इतर विमा उत्पादनांसाठी भागीदारी
मुंबई: चोला एमएस जनरल इन्शुरन्स या मुरुगप्पा समूह आणि मित्सुई सुमितोमो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, जपान यांच्या संयुक्त कंपनीने महिंद्रा फायनान्स या भारतातील आघाडीच्या नॉन- बँकिंग फायनान्स कंपनीसह धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून मोटर आणि विमा उत्पादने महिंद्रा फायनान्सच्या १० दशलक्षपेक्षा जास्त ग्राहकांना पुरविली जाणार आहेत.
महिंद्रा फायनान्सच्या भारतात पसरलेल्या विस्तारित वितरण नेटवर्कच्या माध्यमातून चोला एमएसने सर्वसाधारण विमा, खास तयार केलेल्या डिजिटल सुविधांसह विस्तारण्याचे ठरविले आहे. ही ग्राहकाभिमुख उत्पादने ग्राहक व त्यांच्या कुटुंबांना दीर्घकालीन आर्थिक संरक्षण पुरविण्याच्या हेतूने तयार करण्यात आली आहेत. दोन्ही कंपन्या नावीन्य आणि सातत्य यांसह वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला दर्जेदार सेवा देण्यासाठी बांधिल आहेत.
चोला एमएसचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. सूर्यनारायणन म्हणाले, ‘एमएमएफएसएलसह करण्यात आलेली भागीदारी आमचे वितरण नेटवर्क मजबूत करेल आणि विकासाच्या संधी सर्वदूर विकसित करेल. २६ राज्यांतील आमचे अस्तित्व, ६०० पेक्षा जास्त टचपॉइंट्स आणि मोटर, गृह, आरोग्य, वैयक्तिक अपघात यांचा समावेश असलेली वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणी यांच्या मदतीने आम्ही देशभरातील ग्राहकांना सेवा देण्यास सज्ज आहोत.’
महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रॉल रिबेलो म्हणाले, ‘चोला एमएस जनरल इन्शुरन्ससह भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. या भागीदारीच्या माध्यमातून मोटर आणि इतर जीवन विमा उत्पादने आमच्या ग्राहकांना पुरविली जाणार आहेत. ही भागीदारी ग्राहकांना वैयक्तिक सेवा देण्याच्या आणि उद्योन्मुख भारताला जबाबदार आर्थिक सेवा भागीदार मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.’
