Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत अन् छोटा पुढारी भिडले

 

Bigg Boss Marathi New Season Day 11 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज दुसरं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. या नॉमिनेशन कार्यात कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या नॉमिनेशन कार्यात अभिजीत सावंत आणि छोटा पुढारी एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत. तसेच नॉमिनेट झालेल्या कोणत्या सदस्याला बिग बॉस सेफ करणार हे पाहावे लागेल.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये पॅडी-योगिता, निखिल-सूरज, वर्षा-जान्हवी, अरबाज-धनंजय, वैभव-इरिना, आर्या-अभिषेक, वर्षा-घन:श्याम अशा जोड्या बनलेल्या दिसत आहेत. घरातील सदस्यांनी अंडी, कांदा-बटाटा अशा अनेक गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. दरम्यान अभिजीत सावंत आणि छोटा पुढारी एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत.

अंडी, बटाटा आणि कांदे अशा अनेक गोष्टी ‘बिग बॉस मराठी’च्या सदस्यांनी नॉमिनेट केल्याने घरात जेवण बनवायचे वांदे होणार आहेत. सदस्यांचे झालेले वांदे पाहायला प्रेक्षकांना मात्र मजा येणार आहे.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर.

ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading