“संस्कृती न पाळणारी पागल मुलगी”- आर्याचा संताप अनावर
Bigg Boss Marathi New Season Day 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोणता सदस्य कोणावर पलटेल हे सांगू शकत नाही. नव्या सीझनच्या सुरुवातीला ‘बिग बॉस’प्रेमींना नुकताच याचा अनुभव आला आहे. नॉमिनेशन कार्यादरम्यान निक्की आणि अरबाजसोबत आर्या वेगळी वागली आणि नंतर टास्कनंतर तिचं वेगळंच रूप पाहायला मिळालं. आर्याचा संताप अनावर झालेला दिसून आला. तसेच “संस्कृती न पाळणारी पागल मुलगी”, असं निक्कीला म्हणताना ती दिसून आली.
आजच्या भागात आर्या निक्कीला म्हणते,”मी काय बोलायचं हे तु्म्ही मला सांगू शकत नाही”. त्यावर निक्की आर्याला डबलढोलकी म्हणते. तसेच पहिलं नॉमिनेशन आल्यावर आर्या अरबाजकडे येऊन तिला वाचवण्यासाठी म्हणाली होती असंही निक्की इतर सदस्यांना सांगते. निक्की म्हणते,”एक नंबरची फट्टू आहेस तू”. यावर आर्या पुढे म्हणते,“महाराष्ट्र पाहतोय संस्कृती न पाळणारी पागल मुलगी”.
दुसरीकडे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, अभिजित सावंत आणि धनंजय पोवार गप्पा मारताना दिसून येत आहेत. तेव्हा अभिजीत सावंत अरबाजचं कौतुक करताना दिसत आहे. अभिजीत म्हणतो,”अरबाजचं एक वाक्य मला प्रचंड आवडलं. तो म्हणाला की,”वैयक्तिकरित्या तुम्ही जिंकू शकत नाही. पण वैयक्तिकरित्या तुम्ही निर्णय घेऊ शकता”. मुळात आपण एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहिजे. चांगलं खेळण्याचा प्रयत्न करुयात”.
‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.
ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #Endemolshine #BBM #Promo
