Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ऑनर किलींगने छ. संभाजीनगर हादरले; सासऱ्याकडून जावयाची हत्या 

छत्रपती संभाजीनगर : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने भोसकून संपवल्याची संतापजनक घटना  छत्रपती संभाजीनगर शहरातील इंदिरानगरमध्ये ही घटना घडली. लग्नं नंतर केवळ तीनच महिन्यात ही घटना घडल्याने परिसरात शोकाकुल  वातावरण आहे. या प्रकरणी मुलीचे वडील आरोपी गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब  किर्तीशाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या दोघेही फरार आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमित साळुंखे याचे त्याच्या बाल मैत्रिणी सोबत विद्या सोबत प्रेमसंबंध होते. मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोधाला डावलून अमित व विद्या यांनी एप्रिल महिन्यात पळून जाऊन लग्न केले. काही दिवसांनी अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते.

शेवटी 14 जुलै रोजी विद्याचे वडील आणि चुलत भावाने संभाजी नगरच्या इंदिरानगरमध्ये दोघांनी आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमितवर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला. या घटनेत अमित गंभीर रित्या जखमी झाला होता. त्याच्या पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने गंभीर अवस्थेत ट्याला घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, 12 दिवसानंतर अमितशी मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading