Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

यशदा येथे पशुगणना अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

पुणे  – केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 21 व्या पशुगणनेच्या क्षेत्रीय कामास 1 सप्टेंबर पासून सुरुवात होत असून त्यानुषंगाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे पशुगणनेचे उद्धाटन करण्यात आले: तसेच पशुगणनेकरीता नेमणूक करण्यात आलेल्या राज्य पशुगणना व जिल्हा पशुगणना अधिकारी यांची राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेस सांख्यिकी प्रभागाचे सांख्यिकी सल्लागार जगत हजारिका, केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागातील सांख्यिकी प्रभागाचे संचालक व्ही. पी. सिंह, संचालक बी.पी. मिश्रा, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. संजीव सिंह, दमन व दीव आणि दादरा नगर हवेली पशुसंवर्धन विभागाचे संचालक तथा सहसचिव शिवम तिओतिया, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते.

संचालक  मिश्रा यांनी 21 व्या पशुगणनेमध्ये एकूण 219 पशुधनाच्या जातींची गणना होणार असल्याचे नमूद केले. सांख्यिकी सल्लागार जगत हजारिका यांनी या वर्षीची पशुगणना मोबाईल ॲपद्वारे होणार असून संकलित केलेल्या माहितीचा उपयोग भविष्यात योजनांच्या आखणीसाठी उपयोगी पडणार असल्याचे सांगितले.

पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन पशुगणना व भारत सरकारतर्फे विकसित केलेल्या पशुधन पोर्टलचे महत्व विषद केले. यावेळी वर्णन नसलेल्या जनावरांची संख्या कमीत कमी रहावी याकरीता राज्यातील मान्यताप्राप्त जनावरांची ओळख काळजीपूर्वक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याकरीता केंद्र शासनाच्या एनडीएलएम पोर्टलचा प्रभावीपणे वापर करण्यात यावा, तसेच ई-प्रिस्क्रिप्शनचा पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये प्रभावी वापर करण्यात यावा, असे आवाहनही श्री.दिवेगावकर केले.

राज्यात विविध पशुरोगांचे मान्सूनपुर्व लसीकरण जवळपास 95 ते 97 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे यावेळी रोग प्रादुर्भाव नोंद झालेला नाही. यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी चांगली कामगिरी बजावली असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी दृकश्राव्य संदेशाद्वारे मनोगत व्यक्त करुन पशुगणनेसाठी शुभेच्छा दिल्या व अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या शुभेच्छापर संदेशाचे वाचन करण्यात आले. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाचे सांख्यिकी प्रभाग संचालक व्ही. पी. सिंह यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

उद्धाटनानंतर केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र राज्यातील तसेच दमण व दिव आणि दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशांतील राज्य पशुगणना अधिकारी व जिल्हा पशुगणना अधिकारी यांना 21 व्या पशुगणनेच्या विकसित मोबाइल ॲप, वेब आधारित आणि डॅशबोर्ड मॉनिटरिंग या विषयी प्रशिक्षण देण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading