तिसरी स्पोटर्सफिल्ड मान्सुन लीग : मिलेनियम नॅशनल स्कूल, एके स्पोटर्स अॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी
सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ओम देशपांडे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मिलेनियम नॅशनल स्कूलने गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीचा २३ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना मिलेनियम नॅशनल स्कूलने १६२ धावा धावफलकावर लावल्या. अर्घ्य मांजरेकर याने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीचा डाव १३९ धावांवर आटोपला. मानस कुलकर्णी याने ३५ धावांची खेळी केली. ओम देशपांडे याने २६ धावात ३ गडी बाद केले आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.
सृष्टी भांगे हिने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एके स्पोटर्स अॅकॅडमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबचा १ गडी राखून पराभव करून विजयांचा चौकार नोंदविला. पहिल्यांदा खेळताना स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबने ३० षटकात १०५ धावा उभ्या केल्या. आर्यन कित्तुरे याने ३३ धावांची तर, आदर्श चोरगे याने ३८ धावांची खेळी केली. सृष्टी भांगे हिने २९ धावात ३ गडी टिपले. एके स्पोटर्स अॅकॅडमीने हे लक्ष्य ९ गडी गमावून पूर्ण केले. राजवीर देशमुख (२३ धावा) आणि अन्वय वाशिमकर (१८ धावा) यांनी संघाला विजय मिळवून दिला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
मिलेनियम नॅशनल स्कूलः २७.४ षटकात १० गडी बाद १६२ धावा (अर्घ्य मांजरेकर ४५ (४७, १० चौकार), स्वराज एम. १९, अर्णव कोतवाल १६, कार्तिक निंबाळकर ३-१७, रूद्र आम्ले ३-२८) वि.वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीः २५.१ षटकात १० गडी बाद १३९ धावा (मानस कुलकर्णी ३५, विजयांश सिंग १५, ओम देशपांडे ३-२६); सामनावीरः ओम देशपांडे;
स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबः ३० षटकात १० गडी बाद १०५ धावा (आर्यन कित्तुरे ३३, आदर्श चोरगे ३८, सृष्टी भांगे ३-२९) पराभूत वि. एके स्पोटर्स अॅकॅडमीः ३० षटकात ९ गडी बाद १०७ धावा (राजवीर देशमुख २३, अन्वय वाशिमकर १८, आर्यन कित्तुरे ३-१८, आदर्श चोरगे ३-२४); सामनावीरः सृष्टी भांगे;
