Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राज्यातील ‘त्रिकुट सरकारचे’ मनसुबे ऊघड..! ‘शिक्षण हक्क कायद्याची’ उच्च न्यायालयाने बूज राखली..!


काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची प्रतिक्रिया
पुणे : स्वातंत्र्योत्तर ‘प्रजासत्ताक भारतास’ खऱ्या अर्थाने, आत्म निर्भर होण्यासाठी ‘शिक्षण हाच मुलभूत आघार’ असल्याने, तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनियाजीं व पंतप्रधान डॅा मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘काँग्रेस प्रणीत युपीए सरकारने’ (अन्न सुरक्षा कायद्या बरोबरच्) आर्थिक दृष्ट्या मागास अर्थात गरीब पालकांच्या मुलांसाठी २५% राखीव जागा ठेऊन त्यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत मिळण्यासाठी “शिक्षण हक्क” कायदा केला. या मागे लोकशाही व्यवस्थेतील समानता, सामाजिक न्याय व महात्मा गांधींच्या जनकल्याण राज्य व्यवस्थेच्या संकल्पनेचे अधिष्ठान आहे व काँग्रेस पक्ष या विषयीची बांधिलकी सतत जोपासत आला आहे.
मात्र पुरेगामी महाराष्ट्रात, प्रतीगामी विचारांच्या दावणीला गेलेल्या राज्यातील ‘त्रिकुट सरकारने’ काही खाजगी शिक्षण संस्थांच्या दबावाखाली, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत गरिबांच्या २५% मुलांना शिक्षण देण्याच्या जबाबदारी पासुन पळ काढण्याचे धोरण अवलंबुन, या प्रवेशांबाबत स्थगिती देण्याचे अन्याय्य, असंवैधानिक व तुधलकी फर्मान काढले होते.
काबाड कष्ट करणाऱ्या व आर्थिक परिस्थितीने जर्जर पालकांना (परवडत नसले तरी देखील) शिक्षण कायद्या अंतर्गत पाल्यास प्रवेश मिळेल व पुढे ‘तो वा ती’
शिक्षण घेऊन, गरीबीवर व परिस्थितीवर मात करतील या आशेने पालक वर्ग प्रयत्नशील होता व न्यायालयाकडे डोळे लावुन बसला होता.
अखेर काँग्रेस काळात झालेल्या “शिक्षण हक्क” कायद्यामुळेच् उच्च न्यायालयाने कायद्याची व संविधानिक हक्काची बूज राखली व त्रिकुट सरकारचा स्थगिती आदेश निरस्त केला, फेटाळून लावला ही बाब ‘शिक्षण हक्क कायद्यावर संविधानिक मोहोर ऊठवणारी’ व आत्मनिर्भर देशा’ करीता शिक्षणाची गरज ऊदधोषीत करणारी, गरीब पालकांच्या मुलांप्रती न्याय्य असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले व ‘न्याय संस्थेचे अभिनंदन करून आभार प्रकट केले’..!
तसेच मोदींच्या विकसीत भारतात शिक्षणाची गळचेपी भाजप शासीत राज्यांकडुन होऊ नये याचा किमान मोदी – शहांच्या भाजपने न्यायालयीन निर्णया पासून बोध घ्यावा, असेही सांगितले कारण उत्तर प्रदेश व कर्नाटक मघील भाजप सरकारचे ‘शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधातील’ प्रयत्न अखेर ऊघड होत असल्याची टिका देखील काँग्रेस ने केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading