सब ज्युनिअर आणि ज्युनिअर राज्यस्तरीय निवड चाचणी 2024स्पर्धेत हृदय गर्ग, ऋजुता राजज्ञा, अनिका भाटिया, विवान सोरटे, सारशी दांगट यांना विजेतेपद
पुणे : स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडिया व महाराष्ट्र जलतरण निवड समितीच्या यांच्या वतीने आयोजित सब ज्युनिअर आणि ज्युनिअर राज्यस्तरीय निवड चाचणी २०२४ स्पर्धेत हृदय गर्ग, ऋजुता राजज्ञा, अनिका भाटिया, विवान सोरटे, सारशी दांगट यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद पटकावले.
पुण्यात टिळक तलाव या ठिकाणी आज पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 200मी ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात 17 वर्षाखालील मुलांच्या गटात मुंबईच्या खैज घीवाला(02.32.23से.) याने विजेतेपद पटकावले. तर, पुण्याच्या आर्यवीर पाटील(02.32.23से.) याने दुसरा, तन्मय राजापुरे(02.40.23से.)याने तिसरा क्रमांक मिळवला.
याच प्रकारात 14 वर्षाखालील मुलांच्या गटात नागपूरच्या हृदय गर्ग (02.46.86से) याने विजेतेपद पटकावले. ठाण्याच्या जश रायकुंडलिया(02.48.17से) याने दुसरा आणि पुण्याच्या आयुष पुंडे(02.48.96से)याने तिसरा क्रमांक पटकावला. 100 मीटर बटरफ्लायमध्ये 17वर्षांखालील मु लींच्या गटात पुण्याच्या ऋजुता राजज्ञा हिने 01.05.58से. वेळ नोंदवत विजेतेपदाचा मान पटकावला. याच प्रकारात 14 वर्षाखालील मुलींच्या गटात मुंबईच्या अनिका भाटिया(01.08.01से.)याने नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. पुण्याच्या सारशी दांगट(01.08.68से)याने दुसरे स्थान आणि पुण्याच्या त्विशा दीक्षित(01.08.74से.)हिने तिसरे स्थान मिळवले.
50मी बटरफ्लाय प्रकारात 14 वर्षाखालील मुलींच्या गटात पुण्याच्या सारशी दांगट(00:30:88से) हिने वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, मुंबईच्या अनिका भाटिया(00:31:17से) व पुण्याच्या दक्षिता दुबे(00:31:67से) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. 100मी बॅकस्ट्रोकमध्ये 11 वर्षाखालील मुलांच्या गटात पुण्याच्या विवान सोरटेने 01.19.78सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाला गवसणी घातली.
निकाल: प्रथम, द्वितीय व तृतीय याक्रमानुसार:
50मी बटरफ्लाय: 14 वर्षाखालील मुली:
1.सारशी दांगट(00:30:88से,पुणे), 2.अनिका भाटिया(00:31:17से,मुंबई), 3. दक्षिता दुबे(00:31:67से,पुणे);
100मी बॅकस्ट्रोक: 11 वर्षाखालील मुले:
1.विवान सोरटे(01.19.78से.,पुणे), 2.महेंद्र सरनोबत(01.20.33से.,कोल्हापूर), 3.अबीर सेठ(01.22.92से.,मुंबई);
200मी ब्रेस्ट स्ट्रोक: 17 वर्षाखालील मुले:
1.खैज घीवाला(02.32.23से.,मुंबई), 2.आर्यवीर पाटील(02.32.23से.,पुणे), 3.तन्मय राजापुरे(02.40.23से.,पुणे);
1.खैज घीवाला(02.32.23से.,मुंबई), 2.आर्यवीर पाटील(02.32.23से.,पुणे), 3.तन्मय राजापुरे(02.40.23से.,पुणे);
200मी ब्रेस्ट स्ट्रोक: 14 वर्षाखालील मुले:
1.हृदय गर्ग(02.46.86से, नागपूर), 2.जश रायकुंडलिया(02.48.17से, ठाणे), 3.आयुष पुंडे(02.48.96से, पुणे);
1.हृदय गर्ग(02.46.86से, नागपूर), 2.जश रायकुंडलिया(02.48.17से, ठाणे), 3.आयुष पुंडे(02.48.96से, पुणे);
100 मीटर बटरफ्लाय: 17वर्षांखालील मुली:
1.ऋजुता राजज्ञा(01.05.58से.,पुणे), 2.प्रतिष्ठा डांगी(01.06.39से.,ठाणे), 3.झारा बक्सी(01.07.50 से.,मुंबई);
100मी बटरफ्लाय: 14 वर्षाखालील मुली:
1.अनिका भाटिया(01.08.01से., मुंबई), 2.सारशी दांगट(01.08.68से, पुणे), 3.त्विशा दीक्षित(01.08.74से., पुणे).
