Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

माँडेलीझ इंडियाचा एनएसडीसीसह सहयोग

महाराष्‍ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये युथ स्किलिंग प्रोग्राम सुरू केला

मुंबई : माँडेलीझ इंडियाने नॅशनल स्किल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) सोबत सहयोगाने जागतिक युवा कौशल्‍य दिनानिमित्त पुणे, महाराष्‍ट्र आणि भिंड, मध्‍यप्रदेश येथील दोन कौशल्‍य विकास केंद्रांमध्‍ये युथ स्किलिंग प्रोग्राम सुरू केला आहे.

हा उपक्रम नोव्‍हेंबर २०२३ मध्‍ये माँडेलीझ इंडिया आणि एनएसडीसी यांनी स्‍वाक्षऱ्या केलेल्‍या सामंजस्‍य करारावर (एमओयू) आधारित आहे, ज्‍याचा पुणे व भिंडमधील ६६० तरूणांना सक्षम करण्‍याचा उद्देश आहे. तसेच हा उपक्रम माँडेलीझ इंडियाचा राष्‍ट्रीय सीएसआर प्रोग्राम – शुभ आरंभचे विस्‍तारीकरण आहे, ज्‍याने युथ स्किलिंगसह विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून गेल्‍या दहा वर्षांत १००,००० लाभार्थींच्‍या जीवनात सकारात्‍मक बदल घडवून आणला आहे.

माँडेलीझ इंटरनॅशनलच्‍या भारतातील वरिष्‍ठ संचालक, कॉर्पोरेट अँड गव्‍हर्नमेंट अफेअर्सच्‍या भारतातील प्रमुख , एशिया पॅसिफिक, मिडल ईस्‍ट व आफ्रिकामधील प्रमुख ऑफिरा भाटिया म्‍हणाल्‍या, ”दशकभरात आमचा राष्‍ट्रीय सीएसआर उपक्रम ‘शुभ आरंभ’च्‍या माध्‍यमातून आम्‍ही आमच्‍या युथ स्किलिंग प्रोग्राम्‍ससह जवळपास १००० तरूणांना सक्षम केले आहे. एनएसडीसीसोबत सहयोगाने पुणे व भिंड येथे युथ स्किलिंग प्रोग्रामची सुरूवात भारतातील तरूणांना सक्षम करण्‍याप्रती आमच्‍या सातत्‍यपूर्ण प्रयत्‍नामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे. एनएसडीसीसोबत आमच्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आणि तज्ञ सहयोगांचा फायदा घेत आमचा प्रशिक्षण देण्‍याचा आणि संभाव्‍य करिअर प्रगतीसाठी मार्ग सुकर करण्‍याचा मनसुबा आहे. आमचे तरूणांना आजच्‍या रोजगार बाजारपेठेत प्रगती करण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थांमध्‍ये योगदान देण्‍यासाठी आवश्‍यक कौशल्‍यांसह सक्षम करत शाश्‍वत सकारात्‍मक परिणामाला चालना देण्‍याचे उद्दीष्‍ट आहे.”

एनएसडीसीच्‍या रिसर्च अँड इम्‍पॅक्‍टच्‍या उपाध्‍यक्ष डॉ. अर्चना पाटणकर म्‍हणाल्‍या, ”जागतिक युवा कौशल्‍य दिनानिमित्त आम्‍हाला माँडेलीझ इंडियासोबत सहयोगाने पुणे व भिंड येथील आमच्‍या दोन कौशल्‍य केंद्रांमध्‍ये युथ स्किलिंग प्रोग्राम्‍सच्‍या शुभारंभाला साजरे करण्‍याचा अभिमान वाटतो. या उपक्रमामधून तरूणांना उद्योग-संबंधित कौशल्‍यांसह सक्षम करण्‍याप्रती, त्‍यांची रोजगारक्षमता वाढवण्‍याप्रती आणि स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थांमध्‍ये योगदान देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. व्‍यवस्‍थापन, आदरातिथ्‍य, रिटेल, आयटी-आयटीईएस आणि लॉजिस्टिक्‍स अशा प्रमुख क्षेत्रांमध्‍ये लक्ष्‍य प्रशिक्षण देत आम्‍ही कौशल्‍यांमधील तफावत दूर करत आहोत, तसेच अर्थपूर्ण करिअर संधींसाठी दरवाजे खुले करत आहोत. सहयोगाने, आम्‍ही भविष्‍यासाठी सुसज्‍ज कर्मचारीवर्ग घडवत आहोत, जे डायनॅमिक जागतिक बाजारपेठेत प्रगती करू शकतील.”

उमेदवारांना व्‍यवस्‍थापन, आदरातिथ्‍य व पर्यटन, रिटेल, आयटी-आयटीईएस व लॉजिस्टिक्‍स अशा क्षेत्रांमध्‍ये प्रशिक्षण देण्‍यात येईल, जे रोजगार मूल्‍यांकन आणि स्‍थानिक उद्योग व रोजगार बाजारपेठांच्‍या कौशल्‍य संबंधित मागण्‍यांनुसार ओळखण्‍यात आले आहेत.  पुण्‍यामध्‍ये ३०० हून अधिक उमेदवारांना ऑफिस, डॉक्‍युमेण्‍टेशन, कस्‍टमर केअर इत्‍यादी पदांसाठी प्रशिक्षण मिळेल. तसेच, भिंडमध्‍ये ३०० हून अधिक उमेदवारांना सिक्‍युरिटी, रिटेल व फ्रण्‍ट ऑफिस इत्‍यादी पदांसाठी प्रशिक्षण मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading