Saturday, June 13, 2026
BusinessLatest News

भारतातील सर्वाधिक टिकाऊ टॉप 10 ब्रँड्समध्ये रेमंड : ब्रँड फायनान्सचा अहवाल

 

मुंबई :  ​​ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स (BSI) रेटिंग प्रथमच मिळवून रेमंडने भारतातील टॉप 10 सर्वात टिकाऊ ब्रँड्सच्या क्रमवारीत सन्मानाने प्रवेश केला आहेनुकत्याच आलेल्या ब्रँड फायनान्स अहवालात याची माहिती देण्यात आली आहेया क्रमवारीसह २०२४ वर्षात रेमंडने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे

इंग्लंड आणि वेल्समधील चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेद्वारे नियंत्रित केली जाणारी ब्रँड फायनान्स ही जगातील आघाडीची ब्रँड व्हॅल्युएशन कन्सल्टन्सी आहेइंटरनॅशनल व्हॅल्युएशन स्टँडर्ड्स कौन्सिलमध्ये सहभागी झालेली ही अशा प्रकारची पहिलीच कन्सल्टन्सी आहे.

या अहवालात भारतीय उद्योगातील रेमंडच्या अपवादात्मक वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहेरेमंडच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 12% ची उल्लेखनीय वाढ होऊनती 305 USD दशलक्षपर्यंत पोहोचली आहेभारतीय बाजारपेठेत स्पर्धा असली, तरी कामातील सातत्यामुळे एक ब्रँड म्हणून रेमंड मजबूत झाला आहे.

या कामगिरीवर भाष्य करताना रेमंड लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया म्हणाले, “भारतातील सर्वोच्च ब्रँडमध्ये आमचा समावेश झाल्याचा आम्हाला अभिमान आहेरेमंडला मिळालेला समृद्ध वारसानावीन्यपूर्ण व्यवसाय धोरणेगुणवत्तेत सातत्य आणि ग्राहक समाधानाला असलेले सर्वोच्च प्राधान्य हेच आमच्या बांधिलकीचे फलित आहेब्रँड फायनान्सच्या अहवालात झालेला समावेश ही नवीन ओळख उद्योग जगतात आमचे नेतृत्व स्थान टिकवून ठेवण्याच्या आमच्या संकल्पनेला बळकटी देतेआमच्या कर्मचाऱ्यांची कामाप्रती असलेली निष्ठाग्राहकांचा विश्वास आणि आमच्या ब्रँडची ताकद हेच आमच्या यशाचे मुख्य कारण आहे.

आपल्या समृद्ध वारशामुळे भारतीयांसाठी रेमंड हे 100% रिकॉल व्हॅल्यू असलेले घराघरातील नाव आहेत्यातही रेमंडची द कम्प्लीट मॅन” ही टॅगलाही अत्यंत आयकॉनिक आणि हटके आहेयासोबतच त्यांची ट्युनही अनोखी आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजेरेमंडच्या सहभागाशिवाय भारतातील एकही लग्न होत नाही.

सध्या ९९व्या वर्षात असलेले रेमंड हे  सप्टेंबरमध्ये शतकपूर्ती वर्षात पदार्पण करणार आहेसंपूर्ण भारतातील ६०० शहरे आणि गावांमध्ये 1500+ आउटलेट्स असलेले रेमंड ही भारतातील सर्वात मोठ्या गारमेंटिंग/टेक्सटाइल आस्थापनांपैकी पैकी एक आहेसातत्याने प्रगतीच्या दिशेने जाण्याचा एखाद्या व्यवसायाचा जो ध्यास असतोत्याच्याशी सुसंगत अशीच त्यांची रणनीती आहे.

रेमंडची आजवरची वाटचाल समजून घेणे महत्त्वाचे आहेसमृद्ध वारसा असला, तरीही तो टिकविण्यासाठी केलेली मेहनत जास्त महत्त्वाची आहेयामुळेच रेमंड्सचे कार्यक्षेत्र विस्तारते आहेआपल्या समृद्ध वारशाला साजेसे आणि ग्राहकांचा कंपनीप्रती असलेला विश्वासकंपनीची गुणवत्ता आणि उत्कृष्टता अशा सगळ्या गोष्टींच्या आधारे रेमंड आता रिअल इस्टेटमध्ये उतरले आहेआपल्या समृद्ध वारशाच्या आधारेच रेमंड रिल्टी समूहाचा वारसा पुढे नेत एमएमआरमधील विस्तारीकरणावर लक्ष केंद्रित करते आहेते ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवूनच.

आत्मनिर्भर आणि विकसित भारत या देशाला प्रगतिपथावर नेण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशी रेमंडची वाटचाल आहे.  या अनुषंगाने कंपनीचा विकास करतानाच रेमंड देशाची सेवा करण्यासाठीही कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading