Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

बेलवलकर हाउसिंगचे संचालक अजित बेलवलकर यांचे निधन

 

पुणे : पुण्यातील बेलवलकर हाउसिंगचे संचालक अजित बेलवलकर यांचे काल (दिनांक १३ जुलै) स्वित्झर्लंडमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ५४ वर्षीय बेलवलकर पर्यटनासाठी स्वित्झर्लंड येथे गेले होते. बांधकाम क्षेत्रात आपल्या कर्तृवाचा ठसा  उमटवणारे बेलवलकर स्वतः एक उत्तम सरोद वादक होते. बेलवलकर सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात ते अग्रेसर असत. त्यांचे मागे आई मीना, पत्नी संपदा, मुलगा नील, मुलगी निर्मोही व भाऊ समीर असा परिवार आहे. येत्या २-३ दिवसात त्यांचे पार्थिव पुण्यात आणले जाईल व त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती बेलवलकर कुटुंबियांचे स्नेही राजेश दामले यांनी कळवली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading