सेरेन स्ट्रायकर्स संघाचा विजयी चौकार; पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबचे दोन विजय
पुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित चौथ्या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत सेरेन स्ट्रायकर्स संघाने सलग दोन वि जयांसह स्पर्धेत विजयी चौकार नोंदविला. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून दोन विजय मिळवले.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत सेरेन स्ट्रायकर्स संघाने सलग दोन विजय नोंदविले. पहिल्या सामन्यामध्ये जय कुमार याने फटकावलेल्या नाबाद १०४ धावांच्या जोरावर सेरेन स्ट्रायकर्सने कॉर्पोरेट विलोव्हर्स संघाचा ५ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळताना कॉर्पोरेट विलोव्हर्सने १७१ धावांचे आव्हान उभे केले होते. सेरेन स्ट्रायकर्स संघाच्या जय कुमार याने ५२ चेंडूत ९ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने नाबाद १०४ धावांची खेळी करून संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
दुसर्या सामन्यामध्ये रोमित जोशी याने केलेल्या ५९ धावांच्या खेळीमुळे सेरेन स्ट्रायकर्स संघाने रॉयल स्पोर्ट्स क्लबचा ७ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल स्पोर्ट्स क्लबने १०३ धावा धावफलकावर लावल्या होत्या. रोमित जोशी याने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५९ धावांची खेळी करताना सेरेन स्ट्रायकर्सला १०.५ षटकामध्ये सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
कॉर्पोरेट विलोव्हर्सः १९.३ षटकात १० गडी बाद १७१ धावा (नितीन चौहान ६२ (३२, ६ चौकार, ३ षटकार), रोनक पटेल २९, चिन्मय कुर्वे २८, जीत भावसार ३-३३, कुलदीप नायडु ३-२७) पराभूत वि. सेरेन स्ट्रायकर्सः १६.१ षटकात ५ गडी बाद १७३ धावा (जय कुमार नाबाद १०४ (५२, ९ चौकार, ९ षटकार), साहील महाजन ३१, उमेश सिंग २-२२); सामनावीरः जय कुमार;
रॉयल स्पोर्ट्स क्लबः १४.१ षटकात १० गडी बाद १०३ धावा (श्रवय एम. ६३ (२४, ८ चौकार, ४ षटकार), आकाश पुरोहीत ३-१४, सुनिल टक्के २-३, कुलदीप नायडु २-१०) पराभूत वि. सेरेन स्ट्रायकर्सः १०.५ षटकात ३ गडी बाद १०७ धावा (रोमित जोशी ५९ (३३, ५ चौकार, ४ षटकार), अभय चौगुले नाबाद २२, सौरभ केतकर १-१०); सामनावीरः रोमित जोशी;
पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबः १९.४ षटकात १० गडी बाद १५१ धावा (निखील नासेरी ५० (३२, ६ चौकार, ३ षटकार), राहूल सिद्धार्था नाबाद ३१, परवेझ पटेल २०, अभिषेक कौशिष २-१५, गौरव बाबर २-२२) वि.वि. विस्ट्रॉन ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स्ः १३ षटकात १० गडी बाद ९३ धावा (गौरव बाबर २१, कौस्तुभ बाकरे १९, देव चौधरी ४-२४, निखील नासेरी २-१२, कपिल कुर्लेकर २-९); सामनावीरः निखील नासेरी;
