Friday, August 14, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

पुणे : प्रादेशिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यात उद्या, ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले  आहेत. तसेच मनपा आयुक्त पुणे यांचे सूचनेनुसार पुणे मनपा क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांना उद्या  (दि.9) सुट्टी जाहीर करण्यात आले असल्याची माहिती पुणे मानपाच्या प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अतीवृष्टीच्या काळात नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading